Symptoms Of Prostate Cancer : प्रोस्टेट कॅन्सर म्हणजे काय? सर्वाधिक धोका कुणाला? लक्षणे कोणती? जाणून घ्या

Prostate Cancer Reason : प्रोस्टेट कर्करोग हा पुरूषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु वेळाच निदान झाल्याने त्यावर यशस्वी उपचार करता येतात. नियमित तपासणी तसेच प्रोस्टेट कॅन्सरविषयी तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे.
Symptoms Of Prostate Cancer
Symptoms Of Prostate CancerSaam Tv
Published On

Tips To Avoid Prostate Cancer :

प्रोस्टेट कॅन्सर हळूहळू विकसित होतो आणि विशेषत: त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. जोपर्यंत लक्षणे दिसून येतात, तोपर्यंत कॅन्सर अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचलेला असण्याची शक्यता असते.

प्रोस्टेट कर्करोग हा पुरूषांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो, परंतु वेळाच निदान झाल्याने त्यावर यशस्वी उपचार करता येतात. नियमित तपासणी तसेच प्रोस्टेट कॅन्सरविषयी तुमच्या डॉक्टरांशी मोकळेपणाने संवाद साधणे गरजेचे आहे. यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे शक्य होते.

वयाच्या पन्नाशीनंतर सर्वच पुरुषांनी प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी करणे गरजेचे आहे. ज्यांना प्रोस्टेट कॅन्सरची शक्यता अधिक असते, जसे की कौटुंबिक इतिहास किंवा बीआरसीए (BRCA) सारखी अनुवांशिक पूर्वस्थिती असल्यास 40 ते 45 वयोगटाच्या दरम्यान तपासणीस सुरूवात केली पाहिजे. तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की तपासणीमध्ये प्रोस्टेट-विशिष्ट अँटीजनसाठी रक्त तपासणी (पीएसए चाचणी) करणे गरजेचे आहे. नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे ही काळाची गरज आहे. याबाबतची माहिती दिलीये पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा, युरोलॉजिस्ट, डॉ पवन रहांगडाले

1. प्रोस्टेट कॅन्सरची ही सामान्य चिन्हे आणि लक्षणे

प्रोस्टेट कर्करोग लक्षणे दिसण्यास सुरुवात होईपर्यंत, तो सामान्यत: प्रगत अवस्थेत असतो. या रोगाच्या लक्षणांमध्ये लघवी किंवा वीर्यामध्ये रक्त दिसून येते.

Symptoms Of Prostate Cancer
Infertility Issue In Man : ३५ ते ४० वयोगटातील पुरुषांना करावा लागतोय वंध्यत्वाचा सामना, कारणं काय? जाणून घ्या तज्ज्ञांकडून

लघवीच्या समस्या जसे की वारंवार लघवी होणे किंवा कमी प्रमाणात लघवी होणे, मूत्रमार्गात अडथळा, मूत्राशय किंवा आतड्यांच्या हालचालींवरील नियंत्रण गमावणे, नितंबांसारख्या भागात वेदना, पाय कमजोर होणे किंवा सुन्न पडणे, थकवा येणे आणि अनपेक्षितपणे वजन कमी होणे.

प्रोस्टेट कॅन्सर (Cancer) अनेकदा हाडांवरही दुष्परिणाम करतो. ज्यामुळे वेदना होणे, फ्रॅक्चर आणि हलचाल मंदावणे यासारखी लक्षणे दिसून येतात. आपल्याला यापैकी कोणतीही लक्षणे दिसून आल्यास, आपल्या डॉक्टरांकडून त्वरित वैद्यकीय मदत घ्या.

बऱ्याचदा प्रोस्टेट किंवा मूत्रसंस्थेशी संबंधित अनेक लक्षणे प्रोस्टेट कॅन्सरमध्ये दिसून येत नाही आणि त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केल जाते.रेडिएशन थेरपी, प्रोस्टेटेक्टॉमी आणि हार्मोन थेरपी यासारख्या पारंपारिक पध्दती आता टार्गेटेड उपचारांसह जोडल्या जातात.

Symptoms Of Prostate Cancer
Malvani Bangda Fry : चव विसणारच नाही, ट्राय करा चमचमीत मालवणी बांगडा फ्राय; पाहा रेसिपी

प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे (Symptoms) प्रसाराद्वारे लक्ष्यित केलेल्या स्थानानुसार बदलू शकतात. पण पायात पसरलेल्या ट्यूमरचे एक चिन्ह दिसू शकते, जे म्हणजे सूज. सूज यामुळे येते कारण प्रोस्टेट कॅन्सर लिम्फ नॉड्समध्ये पसरतो. त्या भागात द्रव साठल्यामुळे पायांमध्ये सूज येऊ शकते. या सूजला लिम्फोएडेमा म्हणतात.

2. प्रोस्टेट कर्करोगापासून दूर राहण्यासाठी टिप्स

निरोगी जीवनशैली अंगीकारल्याने प्रोस्टेट कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. आठवड्यातून पाच दिवस 30 मिनिटे मध्यम कसरत करून, तुम्ही तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीचे आरोग्य वाढवता आणि प्रोस्टेटच्या समस्या दूर ठेवता.

Symptoms Of Prostate Cancer
Navi Mumbai Travel Places: नवी मुंबईतील ही ठिकाणे आहेत फिरण्यासाठी बेस्ट!

या प्रकारच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी आपल्या चांगल्या जीवनशैलीबरोबच संतुलित आहाराचे सेवन करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच वजन नियंत्रित राखण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com