mysterious incident was caught on the CCTV camera shocking strange road accident video goes viral  Saam TV
देश विदेश

Viral Video: अरे बापरे! कॅमेऱ्यात कैद झाली रहस्यमय घटना, व्हिडिओ पाहून नेटकरी झाले थक्क

Viral Video: अनेकदा असे हैराण करणारे व्हिडीओ समोर येतात, की जे पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही.

Satish Daud

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणार असतात. अनेकदा असे हैराण करणारे व्हिडीओ समोर येतात, की जे पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून नेमका हा प्रकार घडला तरी कसा? असा प्रकार नेटकऱ्यांना पडला आहे. (Latest Marathi News)

व्हायरल झालेला व्हिडीओ एका महामार्गावरील आहे. या व्हिडीओत (Viral News) तीन वाहनं अचानक हवेत उडताना दिसत आहे. ही घटना पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झेब्रा क्रॉसिंगजवळ दोन वाहने उभी आहेत आणि मागून तिसरे वाहन येत आहे.

जेव्हा ही तीनही वाहने झेब्रा क्रॉसिंगवरून पुढे जाऊ लागतात तेव्हाच ती अचानक पाठीमागून हवेत उडतात. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे वाहनचालक गोंधळून जातात. काही कळण्याच्या आतच ही वाहने अपघाताची शिकार होतात. अंगाचा थरकाप उडवणारी ही थरारक घटना सिग्नलवरील सीसीटीव्ही (Viral Video)  कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटरवर @AbsoluteCIown नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहे. १२ एप्रिल रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत २.३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. अवघ्या 17 सेकंदांचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्सनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आश्चर्य व्यक्त केले आहे.

काही युजर्स या व्हिडिओला फेक सांगत आहेत, तर काही या घटनेला एलियन्सचं काम असल्याचंही सांगत आहेत. त्याच वेळी, असे काही वापरकर्ते आहेत जे या रहस्यमय घटनेची तुलना हॉलीवूडच्या एक्स-मेन चित्रपटाशी करत आहेत, ज्यामध्ये मॅग्नेटो नावाचा माणूस समान महासत्ता दाखवताना दिसत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT