Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: थरारक अपघात! भरधाव बसची २ दुचाकींना धडक, चाकाखाली चिरडून ५ जणांचा मृत्यू

Uttar Pradesh Accident: भरधव बसने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये एक जण जखमी झाला आहे.

Priya More
  • मुजफ्फरनगरमध्ये बसच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू

  • भरधाव रोडवेज बसने २ दुचाकींना धडक दिली

  • भैसाना गावाजवळ हा अपघात झाला

  • मुजफ्फरनगर अपघातात तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू

  • बसच्या ओव्हरटेकच्या प्रयत्नात घडली घटना

उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये भीषण रस्ते अपघाताची घटना घडली. भरधाव बसने दोन दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये बसने ५ जणांना चिरडलं. या पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका ३ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. बुधवारी संध्याकाळी बुढाणा परिसरातील भैसाना गावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा मुख्यालयापासून ३५ किलोमीटर अंतरावर, बुढाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भासाना गावाजवळ दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. बसने धडक दिल्यानंतर दोन दुचाकीस्वार रस्त्यावरून दूरवर फेकले गेले. तिघांचा जागीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी झालेल्या दोघांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातात ३ वर्षांच्या मुलीसह एकूण ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चालक बस सोडून घटनास्थळावरून फरार झाला. पोलिस सध्या बस चालकाचा शोध घेत आहेत.

अपघातात मृत्यू झालेल्या दोन व्यक्तींची ओळख इद्रिश आणि साजिद अशी पटली आहे. ते चुलत भाऊ होते आणि कंधला येथील रहिवासी होते. ते कामासाठी मुझफ्फरनगरला आले होते. दुपारी घरी परतत असताना हा अपघात घडला. या घातात मृत्यू झालेले फरमान आणि मोमिन हे मेहुणे होते. फरमान आपला मेहुणा मोमिन आणि त्यांची ३ वर्षांची मुलगी यांच्यासोबत खरेदीसाठी मुझफ्फरनगरला आला होता. खरेदीनंतर ते तिघे बाईकवरून घराकडे जात असताना हा अपघात घडला.

भैसानाजवळील या अपघातामुळे दोन कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. भैसानाजवळील भीषण अपघाताचे खरे कारण समोर आले आहे. रोडवेज बसेसमधील स्पर्धा या अपघाताचे कारण आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दोन रोडवेज बसेस एकमेकांना ओव्हरटेक करून प्रवासी घेण्यासाठी शर्यत करत होत्या. या स्पर्धेत बुढाणा ते मुझफ्फरनगरला जाणाऱ्या एका बसने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि समोरून येणाऱ्या तीन दुचाकींना धडक दिली. या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये एकाला किरकोळ दुखापत झाली. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगेंच्या आंदोलनादरम्यान सरकारचा मोठा निर्णय; 3 जातींचा ओबीसींमध्ये समावेश

Thursday Horoscope : या 4 राशींसाठी मंगळवार ठरणार खास! पैसा, नोकरी आणि व्यवसायात मोठी संधी

Viral News : हायवेवर रील बनवताना डान्स आणि स्टंट केलात तर होणार शिक्षा? किती दंड? काय आहेत नियम? वाचा

Maharashtra News Live Update: विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला प्रकरण, संतोष चव्हाणचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

ChatGPT 80s Photo Trend: ८०s रेट्रो लूकची क्रेझ वाढली; व्हायरल ट्रेंड 'असा' करा ट्राय

SCROLL FOR NEXT