shivraj singh chauhan  ANI
देश विदेश

MP News: भाजपला मतदान केल्यानं महिलेला दीराकडून मारहाण; शिवराज सिंह चौहानांनी घेतली भेट, Video Viral

shivraj singh chauhan : मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यात विचित्र घटना घडली. भाजपला मतदान केल्यामुळे एका महिलेला मारहाण झाल्याची घटना येथे घडली होती. शिवराज सिंह चौहान यांच्या लाड़ली बहना या योजनेने प्रभावित होत या महिलेने भाजपला मतदान केलं होतं. मध्य प्रदेशात भाजपचा विजय झाल्यानंतर या महिलेने आनंद साजरा केला. याचा राग आल्यानंतर दीराने तिला मारहाण केली.

Bharat Jadhav

Shivraj Singh Chauhan Meets Muslim women :

मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळला. शिवराज सिंह चौहान यांची 'लाड़ली बहना' या योजनेचा भाजपला मोठा फायदा झाला. महिलांनी मोठ्या संख्येने भाजपला मतदान केलं. परंतु भाजपला मतदान करणं सीहोर येथील एका मुस्लीम महिलेला महागात पडलं. भाजपला मतदान केल्यामुळे या महिलेला तिच्या दीराने मारहाण केली. आज शिवराज सिंह चौहान यांनी या महिलेची भेट घेतली. शिवराज सिंह चौहान भेटल्यानंतर महिला रडू आलं या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय.(Latest News)

मध्य प्रदेश सरकारची योजना 'लाड़ली बहना' या योजनेने प्रभावित होत मुस्लीम महिलेने भारतीय जनता पक्षाला मतदान केलं होतं. तीन डिसेंबरला मध्य प्रदेशसह चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यातील तीन राज्यात भाजपचा मोठा विजय झाला. या राज्यांमध्ये भाजपचं सरकार स्थापन होणार आहे. मध्य प्रदेशातही भाजपचा विजय झाल्याने ही मुस्लीम महिला खूप आनंदी झाली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपच्या विजयाचा आनंद साजरा करत असताना तिच्या दीराने तिला आनंदी होण्याचं कारण विचारलं. त्यावेळी तिने त्यांना सांगितलं की, राज्यात भाजपचा विजय झाला. त्यावेळी या महिलेच्या दीराला राग आला आणि त्याने तिला काठीने मारहाण केली. दरम्यान आज शिवराज सिंह चौहान यांनी या पीडित महिलेची भेट घेतली. शिवराज सिंह चौहान भेटल्यानंतर ही महिलेला रडू कोसळलं.

दरम्यान मारहाण झाल्यानंतर ही महिलेने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. परंतु पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नसल्यानं ही महिला आपल्या वडिलांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात गेली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी दीराविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

Dangerous Diet Foods : डायटिंग करताय ? हे ३ पदार्थ तुमच्या जीवावर बेतू शकतात.

Maharashtra Live News Update : बोलताना भान ठेवा, अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचे कान टोचले

बसने स्कूटीस्वार तरुणीला चिरडले; घटनास्थळीच मृत्यू; सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Maharashtra Politics : निवडणूका जिंका, महामंडळ मिळवा! चंद्रशेखर बावनखुळे नेमके काय म्हणाले ? | VIDEO

SCROLL FOR NEXT