Madhya Pradesh Election 2023 : माझं नाव शिवराज सिंह चौहान आहे; छोट्या गोष्टींचा मला फरक पडत नाही; मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Political News : विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील प्रचारात व्यस्त आहे. दरम्यान शिवराज सिंह यांनी 'इंडियन एक्सप्रेस' एक सविस्तर मुलाखत दिली.
Shivraj Singh Chauhan
Shivraj Singh ChauhanSaam TV

Madhya Pradesh Election 2023 :

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजपने पुन्हा सत्ता काबिज करण्यासाठी कंबर कसली आहे. राज्यात २३० जागांसाठी येत्या १७ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील प्रचारात व्यस्त आहे. दरम्यान शिवराज सिंह यांनी 'इंडियन एक्सप्रेस' एक सविस्तर मुलाखत दिली.

या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार बनवणे वैगेर अशा छोट्या गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. एखादी व्यक्ती काय आहे, यापेक्षा ती व्यक्ती कशी काम करते याला प्राधान्य दिलं पाहिजे, असंही शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं. (Political News)

Shivraj Singh Chauhan
Pune Breaking News : पुण्यावरचा मोठा धोका टळला; पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून धक्कादायक माहिती उघड

भाजप पुन्हा सत्तेत येणार

भाजप पु्न्हा सत्तेत येणार का? या प्रश्नावर शिवराज सिंह यांनी म्हटलं की, यात कुठलीही शंका नाही. मला विश्वास आहे आम्ही जिंकू. भाजपच्या विजयात सरकारची कोणती योजना महत्त्वाची भूमिका निभावेल असं वाटतं? यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी योजनांचा पाढाच वाचला.

लाडली बहन योजना, स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये ५० टक्के आरक्षण, पोलीस दलात ३० टक्के आरक्षण, सरकारी नोकऱ्यांमध्ये सरळ सेवा भरातीत ३५ टक्के आरक्षण अशा योजना शिवराज सिंह चौहान यांनी सांगितल्या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Shivraj Singh Chauhan
Maratha Reservation: मराठा आरक्षणासंदर्भात बागेश्वर धाम बाबांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, 'देश संकटात असताना...'

पुन्हा मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर बोलाताना त्यांनी म्हटलं की, मला याची चिंता नाही. राजकारणात माझं लक्ष्य सशक्त आणि समृद्ध भारताची निर्मिती हे आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मी भाजपचा कार्यकर्ता आहे.

त्यामुळे कोण काय करणार हे त्यानुसार ठरवलं जाईल. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार न बनवल्याबाबत बोलताना त्यांना म्हटलं की, माझं नाव शिवराज सिंह चौहान आहे. या छोट्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही. तुम्ही काय काम करता हे महत्त्वाचे आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com