Breaking News:  Saam tv
देश विदेश

Breaking News : 'कोरोना विषाणू'सारख्या आणखी एका आजाराची चाहूल; WHO ने दिला मोठा इशारा

mumps Virus news in marathi : राजस्थानमध्ये मम्प्स विषाणूचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या नव्या विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. जयपूरमध्ये या विषाणूची ६ लोकांना लागण झाली आहे.

Vishal Gangurde

Mumps Virus :

राजस्थानमध्ये मम्प्स विषाणूचे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागले आहे. या नव्या विषाणूने सर्वांची चिंता वाढवली आहे. जयपूरमध्ये या विषाणूची ६ लोकांना लागण झाली आहे. या विषाणूग्रस्त लोकांना ऐकण्याची क्षमता गमावली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मम्प्स आजाराची लक्षणे ही लहान मुलांमध्ये अधिक प्रमाणात पाहायला मिळत आहे. या विषाणूचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढू लागले आहेत.

मम्प्स काय आहे?

मम्प्स एक संसर्गजन्य आजार आहे. या आजारामुळे चेहऱ्याच्या दोन्ही बाजूच्या ग्लँडवर परिणाम होतो. ग्लँड हे लाळ बनविण्याचं काम करते. याला पॅरोटिज ग्रंथी देखील बोललं जातं. मम्प्स विषाणूचा शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम होऊ शकतो.

केरळमध्ये मम्प्स विषाणूचा कहर

गेल्या महिन्यात केरळमध्येही मम्प्स विषाणूच्या रुग्णांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. केरळमध्ये १० मार्चपर्यंत ११,४७६ इतके रुग्णांची आढळून आली आहे. तसेच या रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होत आहे.

मम्प्स आजाराचं लक्षणे काय आहेत?

१. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूला सूज येणे

२. चेहऱ्यावर सूज आल्यावर चेहरे, जबडा, कानाजवळ दुखणे

३. कान दुखणे

४. डोकेदुखी होणे

५. हलक्या स्वरुपाचा ताप येणे

६. भूक कमी लागणे

७. अशक्तपणा वाटणे

मम्प्स विषाणूची लागण झालेल्या दोन आठवड्याच्या आत लक्षणे दिसू लागतात. दोन आठवड्यानंतर ताप आणि ग्रंथींमध्ये सूज येते.

मम्प्स आजार कसा पसरतो?

मम्प्स विषाणू हा श्वसननलिकेमध्ये आढळतो. विषाणूची बाधा झालेल्या व्यक्ती लाळ किंवा हवेतील थेंबामुळे लोकांमध्ये पसरतो. यामुळे या व्यक्तीच्या ऐकण्याची क्षमता कमी होते.

मम्प्स विषाणूपासून बचाव कसा करायचा?

एमएमआर लस किंवा एमएमआरव्ही लस टोचून घ्यावी लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT