26/11 Attack Mastermind Sajid Mir  Yandex
देश विदेश

Mumbai 26/11 Attack Mastermind: मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंडवर पाकिस्तानच्या तुरुंगात विषप्रयोग: रिपोर्ट्स

26/11 Attack Mastermind: गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हत्यांचं सत्र चालू आहे. पठाणकोट हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, दिल्लीतल्या संसदेवरील हल्ल्यात अथवा त्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांच्या हत्या होत आहेत.

Bharat Jadhav

Mumbai 26/11 Attack Mastermind Sajid Mir :

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेल्या साजिद मीरची हत्या करण्याचा प्रयत्न झालाय. साजिद मीर हा पाकिस्तानमधील डेरा गाझी खानच्या मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहे. मीरला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला असून तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे. साजिद मीर हा लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी आहे. (Latest News)

साजिद मीर हा लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेतील दहशतवादी आहे. २००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मास्टरमाईंड असणाऱ्यांपैकी एक होता. तो लाहोरच्या मध्यवर्थी कारागृहात असून त्याला जेवणातून विष देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मीरला पाकिस्तानी लष्कराने सीएमएच इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, बहावलपूर येथे विमानाने नेण्यात आले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत ऐकवला होता दहशतवाद्याचा ऑडिओ

भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC)लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याची मागणी भारताने केली होती. भारताच्या या मागणीला चीनने विरोध केला होता. दरम्यान भारतीय सुरक्षा एजन्सीच्या मोस्ट वॉन्टेड यादीत साजिद मीरच्या नावाचा समावेश आहे.

या दहशतवाद्याचा बचाव चीनकडून केला जात होता. चीनच्या दाव्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने UN प्लॅटफॉर्मवर एक ऑडिओ देखील सर्व सभेला ऐकवला. यात मीर हा मुंबईतील २६/११च्या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना सूचना देत असल्याचं स्पष्ट झालं होतं.

अमेरिका आणि भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा प्रतिबंध समिती अंतर्गत मीरला जागतिक दहशतवादी म्हणून काळ्या यादीत टाकले आहे. भारताने त्याची मालमत्ता जप्त करण्याची, हालचालींवर आणि शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध घालण्याची मागणी केली होती. २० जून रोजी चीनने या मुद्द्यावर व्हेटो पॉवर वापरून मीरला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव प्रकाश गुप्ता यांनी मीरचा दहशतवादी कटाचा ऑडिओ यूएनच्या सभेत ऐकवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT