Manipur Latest News : मणिपूरमध्ये दोन गट भिडले, १३ जणांचा मृत्यू

Manipur Two groups clashed: तेंगनोउपल जिल्ह्यातील लेतीथू गावाजवळ दोन गटांकडून गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला.
Manipur Two groups clashed
Manipur Two groups clashedYandex file photo
Published On

Manipur News Update :

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला. तेंगनोउपल जिल्ह्यात सोमवारी दुपारी दोन गट भिडले. बेछूट गोळीबारात १३ जणांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेंगनोउपल जिल्ह्यातील लेतीथू गावाजवळ दोन गटांकडून गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले. या घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला.(Latest News)

रिपोर्ट्सनुसार, मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटलेली नाही. रविवारीच राज्यात सात महिन्यांनंतर मोबाइल इंटरनेट सेवेवरील निर्बंध उठवण्यात आले होते. मात्र, काही जिल्ह्यांतील सीमाभागात अद्याप मोबाइल इंटरनेट सेवा बंद आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेविषयी माहिती देताना सांगितलं की, सुरक्षा दल घटनास्थळापासून सुमारे १० किमी दूर अंतरावर होते. जेव्हा सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना लेथू गावात १३ जण मृत आढळले. सुरक्षा दलाला या मृतदेहांजवळ कोणत्याच प्रकारचे शस्त्रे आढळली नाहीत. मृत झालेल्या व्यक्ती ह्या लेतीथू येथील नसून ते दुसऱ्या ठिकाणाहून आले होते.

दरम्यान यावर्षी मे महिन्यात बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी या दोन समुदायांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. दोन्ही गटातील या तणावात आतापर्यंत १५० जणांचा मृत्यू झालाय आणि ४०० जण जखमी झाले आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी लष्कर, निमलष्करी दल आणि पोलीस तैनात करण्यात आलेत. दोन्ही गटात तणाव असल्याने हजारो लोकांना त्यांचे घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले आहे.

Manipur Two groups clashed
Rahul Gandhi on PM Modi : मणिपूर जळतंय आणि PM मोदी लोकसभेत हसत होते, राहुल गांधींची पंतप्रधानांवर सडकून टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com