Manipur Clashes: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या घरावर जमावाचा हल्ला

Manipur News: गुरुवारी रात्री एका जमावाने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावरच हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Manipur Clashes
Manipur ClashesSaam Tv News
Published On

Manipur Clashes:

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचाराला सुरुवात झाली आहे.गेल्या तीन दिवसांपासून मणिपूर पुन्हा धुमसू लागलं आहे. गुरुवारी रात्री एका जमावाने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावरच हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुरक्षा दलामुळे जमावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे. (Latest Marathi News)

मुख्यमंत्र्याच्या घरावर हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये आक्रमक झालेल्या एका गटाने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या इंफाळ येथील वडिलोपार्जित घरावर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र, आंदोलकांच्या हल्ल्यावेळी घरात कोणी नव्हतं. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. आंदोलकांच्या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केल्याचाही माहिती आहे.

Manipur Clashes
Kalyan News: अरे बापरे! रुग्णालयात जाताना प्रसव कळा; कल्याणच्या स्कायवॉकवरच महिलेची प्रसूती, रिक्षा चालकांनी केली मदत

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 'मणिपूरमधील इंफाळच्या हिगांग भागातील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. घरावर हल्ला करण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना १००० मीटर आधीच रोखल्याचा पोलिसांना दावा केला आहे. या घरात कोणी नसून या घराची सुरक्षा वाढविल्याची माहिती आहे.

मणिपुरात आक्रमक झालेल्या आंदोलकांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. आंदोलक आक्रमक झाल्याने या भागातील वीज देखील प्रशासनाने बंद केली होती. तर आंदोलकांनी काही ठिकाणी रस्त्यावर टायर जाळले होते.

दोन जणांचा मृत्यू

मंगळवारी आंदोलनकर्ते दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर इंफाळ ईस्ट आणि इंफाळ वेस्ट या भागात पोलिसांनी कर्फ्यु लागू केला. तर मंगळवारी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात ६५ जण जखमी झाले.

Manipur Clashes
Manipur News: मणिपूरची धग थांबेना! जमावाने भाजप कार्यालयाला लावली आग; इंटरनेट सेवा बंद

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com