Earthquake Saam Tv
देश विदेश

इराणमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; ५ ठार, ४४ जखमी, यूएईमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

बचाव कार्य सुरू असल्याची माहिती इराणच्या प्रसारमाध्यमांकडून देण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

Iran Earthquake - इराणमध्ये शनिवारी रात्री १.३२ च्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंप इतका जोरदार होता की त्याचे धक्के कतार, यूएई आणि चीनपर्यंत जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपानंतर सुमारे 5 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 44 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. बचाव कार्य सुरू असल्याची माहिती इराणच्या प्रसारमाध्यमांकडून देण्यात आली आहे.

UAE मध्ये भूकंपाचे धक्के जाणवले

इराणी प्रसारमाध्यमांनी भूकंपाची तीव्रता 6.1 सांगितली, तर युरोपियन भूमध्य भूकंप केंद्र \ने सांगितले की त्याची तीव्रता 6.0 होती. EMSC ने सांगितले की भूकंप 10 किमी खोलीवर होता. युएईच्या विविध भागांतील रहिवाशांनाही भूकंपाचे धक्के जाणवल्याचे त्यांनी सांगितले.

हे देखील पाहा -

22 जून रोजी भूकंपाने अफगाणिस्तानात हाहाकार माजवला होता

22 जून रोजी अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाने प्रचंड हाहाकार माजवला होता. या भूकंपात 1000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 1500 हून अधिक लोक जखमी झाले. भूकंपाचे हे धक्के पाकिस्तानमध्ये देखील जाणवले होते. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.1 इतकी मोजण्यात आली होती.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या आग्नेय भागात होता. पक्तिका आणि खोस्त प्रांतात हा भूकंप झाला होता.

कोणता भूकंप धोकादायक ?

भूकंपाची कमाल तीव्रता अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि, रिश्टर स्केलवर ७.० किंवा त्याहून अधिक तीव्रतेचा भूकंप मध्यम धोकादायक मानला जातो. या स्केलवर 2 किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेच्या भूकंपाला सूक्ष्म भूकंप म्हणतात, जो बहुतेक जाणवत नाही. ४.५ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे घरांचे नुकसान होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope: व्हॅलेंटाईन वीक सुरू होताच बहरेल प्रेम; 'या' राशींच्या जीवनात प्रेमासह धनलाभाचे योग, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला अटक करा, अंडर १९ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये मैदानात काय घडलं?

भाजपला मतदान करणं भोवलं; MIM च्या नगरसेविकेची पक्षातून हकालपट्टी, आता पदही जाणार

ठाकरे बंधूंना मोठा धक्का, शरद पवारांची राष्ट्रवादी भाजप-शिंदेसेना महायुतीसोबत

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील जाखले गावातील विहिरीत दोन बिबटे पडले

SCROLL FOR NEXT