Manasvi Choudhary
राजगिरा भाजी ही पावसाळ्यात मिळणारी औषधी रानभाजी आहे.
राजगिरा या भाजीमध्ये लोह, कॅल्शियम ही पौष्टिक जिवनसत्वे असतात. ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही गावरान स्टाईल राजगिराची भाजी बनवू शकता. सोपी रेसिपी आहे.
राजगिराची भाजी बनवण्यासाठी राजगिरा भाजी, हिरवी मिरची, लसूण, तेल, हळद, मीठ हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी राजगिरा भाजी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाजीची पाने बारीक चिरून घ्या.
गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरे, लसूण, हिरवी मिरची चांगली परतून घ्या. नंतर त्यात बारीक चिरलेली राजगिराची भाजी मिक्स करा.
भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजी व्यवस्थित शिजवून घ्या. भाजी शिजली की त्यात चवीनुसार मीठ मिक्स करा.