Madhya Pradesh Indore Family Court News update saam tv
देश विदेश

Indore Family Court News : सासू-सासऱ्यांची देखभालीची जबाबदारी घेण्यास इच्छा नाही; कोर्टाने सूनेला दिले घर रिकामे करण्याचे आदेश

Madhya Pradesh Indore Family Court News update : वयोवृद्ध सासू-सासऱ्यांची जबाबदारी नाकारणाऱ्या सूनेला कोर्टाने घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील कुटुंब न्यायालयातील हे प्रकरण आहे.

Vishal Gangurde

Indore Family Court :

अनेक जण कोर्टाच्या निकालाची वर्षानुवर्षे वाट पाहतात. बहुतांश पीडित कोर्टाच्या निकालाची मोठ्या आशेने वाट पाहत असतात. अशाच एका निकालाची वाट पाहणाऱ्या ८० वर्षांच्या वृद्धाला कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. वयोवृद्ध सासू-सासऱ्यांची देखभालीची जबाबदारी नाकारणाऱ्या सूनेला कोर्टाने घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशमधील इंदूर जिल्ह्यातील कुटुंब न्यायालयातील हे प्रकरण आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटित सूनेला घर रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर निकाल देताना कोर्टाने म्हटलं की, 'सूनेला सासू आणि सासऱ्यांची देखभाल करण्याची कोणतीही इच्छा नाही. तर तिने तातडीने घर रिकामे करावं'.

इंदूरमधील ८० वर्षीय प्राध्यापक महादेव प्रसाद यादव यांनी त्यांच्या प्राध्यापक आणि मुलाची घटस्फोटित पत्नीच्या विरोधात कौटुंबीक कोर्टात खटला दाखल केला होता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय नेमकं प्रकरण?

प्राध्यापक यादव हे विजय नगरमध्ये दुमजली घरात राहतात. यात घरात प्राध्यापक यादव हे त्यांच्या पत्नीसोबत घराच्या दुसऱ्या मजल्यावर राहतात. तर तळमजल्याला त्यांची प्राध्यापक सून राहत होती. मात्र, मागील वर्षी मुलगा आणि सूनेचा घटस्फोट झाला होता. परंतु सून घर सोडायलाच तयार नव्हती. तसेच तिने नवऱ्याच्या विरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता.

सून ही सासू आणि सासऱ्यांसोबत क्रुरतेने वागत होती. सूनेच्या वागणुकीला सासू आणि सासरे कंटाळले होते. सूनेच्या वागणुकीला कंटाळून सासऱ्याने कोर्टात खटला दाखल केला. त्यानंतर या प्रकरणात सुनावणी देताना कोर्टाने म्हटलं की, वयोवृद्ध सासू-सासऱ्यांच्या देखभालीची जबाबदारी घेण्यास सून तयार नाही. त्यामुळे तातडीने घर रिकामे करावे.

कोर्टाने पुढे म्हटलं की, 'सून ही चांगल्या नोकरीवर आहे. त्यामुळे तिला विशेष पोटगी देण्याची गरज नाही'. तर या प्रकरणातील वकील अमर सिंह राठौर यांनी सांगितलं की, 'प्राध्यापक सूनेचा पगार हा दीड लाख रुपये महिना आहे. त्यात प्राध्यापक पत्नीने पतीकडे नुकसान भरपाई मागितली'. दरम्यान, कोर्टाने सूनेच्या वागणुकीवर प्राध्यापक यादव यांच्या मुलाचा घटस्फोट मंजूर केला होता. तसेच कोर्टाने सूनेला घर रिकामे करण्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मशाली'वर निवडून आले, पण आदेश मोडले; बेपत्ता ४ नगरसेवकांवर ठाकरेंचा निलंबनाचा इशारा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कोण सादर करणार? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Saturday Horoscope : आयुष्यात मोठं काही तर घडणार; ५ राशींच्या लोकांनी घराबाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नये, अन्यथा...

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

SCROLL FOR NEXT