Court News
Court News Saam Digital

Court News : पत्नीलाच द्यावी लागणार पतीला दर महिन्याला ५००० हजारांची पोटगी; न्यायालयाने असे निर्देश का दिले? जाणून घ्या

Family Court Case: कौटुंबिक न्यायालयाने ब्यटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेला घटस्फोटानंतर १२ वी पास असलेल्या तिच्या पतीला ५००० हजार रुपये महिन्याला पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत.
Published on

Court News

आतापर्यंत आपण ऐकलं असेल की घटस्फोटांच्या प्रकरणांमध्ये पोटगीची मागणी केली जाते, ती पण पतीलाच द्यावी लागते. पत्नीपासून वेगळं झाल्यानंतर पतीला दर महिन्याला त्याच्या कुवतीनुसार काही रक्कम द्यावी लागते, जेणेकरून ती आपला उदरनिर्वाह करू शकेल. यातच एक नवीन प्रकरण समोर आलं आहे. कौटुंबिक न्यायालयाने ब्यटी पार्लर चालवणाऱ्या एका महिलेला घटस्फोटानंतर १२ वी पास असलेल्या तिच्या पतीला ५००० हजार रुपये महिन्याला पोटगी देण्याचे निर्देश दिले आहेत.

२३ वर्षांच्या अमन कुमारच्या याचिकेवर सुनावणीवेळी न्यायालयाने बुधवारी हा निर्णय दिला आहे. याचिकार्त्याने आपल्या पत्नीमुळे शिक्षण सोडाव लागल्याचं म्हटलं आहे. अमन बेरोजगार आहे तर त्याची २२ वर्षांची पत्नी पदवीधर असून इंदौरमध्ये ब्युटीपार्टर चालवते.

याचिकाकर्ता अमन कुमारचे वकील मनीष जरोले यांनी न्यायालयासमोर, २०२० मध्ये उज्जैनच्या नंदिनीशी मैत्री झाली होती. त्यानंतर नंदिनीने अमनला लग्नासाठी प्रपोज केलं. मात्र, अमन तिच्याशी लग्न करायला तयार नव्हता. त्यामुळे नंदिनीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे २०२१ मध्ये त्यांनी आर्य समाज मंदिरात रितसर लग्न केलं आणि इंदौरमध्ये भाड्याच्या घरात रहात होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

लग्नानंतर काही दिवसांनी नंदिनी आणि तिच्या नातेवाईकांनी अमनला त्रास द्यायला सुरू केला. तसंच त्याचं शिक्षणही थांबवायला सांगितलं. त्यामुळे लग्नानंतर दोनच महिन्यात नंदिलीला सोडून अमन आपल्या आई वडिलांसोबत रहायला लागला.

अमन निघून गेल्यानंतर नंदिनी तो हरवल्याची तक्रार दिली. इकडे अमननेही एका पोलीस ठाण्यात तलाक आणि पोटगीसाठी तक्रार दाखल केली. कौटुंबिक न्यायालयात देखील याचिका दाखल केली. याच दरम्यान नंदिनीने इंदौरमध्ये अमनच्या विरोधात घरगुती हिंसाचाराचा खटला दाखला केला, त्याचसोबत तिने अमन सोबतच राहण्याची इच्छाही व्यक्त केली.

Court News
Court News : पत्नीला पतीने सार्वजनिक ठिकाणी कानशिलात लगावणं गुन्हा ठरत नाही; न्यायालय असं का म्हणालं? जाणून घ्या

अमनच्या विकालांनी दावा केला होता की, नंदिनीने ती बेरोजगार असल्याची आणि अमन नोकरी करत असल्याची खोटी माहिती न्यायालयासमोर दिली आहे. नंदिनीच्या दिलेल्या साक्षीत अनेक विरोधाभास आढळून आले त्यामुळे न्यायालयाने तिची याचिका रद्द केली.

दरम्यान न्यायालयाने नंदिनीला खटल्याच्या खर्चावर आधारित अतिरिक्त रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. नंदिनी आणि त्याच्या नातेवाईकांनी अमनसोबत अपराधि़कृत्य केलं आहे. दरम्यान नंदिनीने आपलं वैवाहिक जीवन परत मिळावं अशी इच्छा व्यक्त केली असून या निर्णयाविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणार आहे.

Court News
Mahua Moitra: महुआ यांना हायकोर्टाचा धक्का, ईडीविरोधातील याचिका फेटाळली; वैयक्तिक माहिती लीक केल्याचा होता आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com