Mount Everest Saam Tv
देश विदेश

Mount Everest: माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा, १००० गिर्यारोहक अडकले; सतर्कतेचा इशारा जारी

1000 Climbers Trapped In Mount Everest: माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला असून १००० गिर्यारोहक तिथे अडकले आहेत. मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होत असल्याने रस्ते बंद झाले आहेत. या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.

Priya More

Summary -

  • माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे.

  • हिमवादळामुळे याठिकाणी १००० गिर्यारोहक अडकले आहेत.

  • गिर्यारोहकांसाठी बचावकार्य सुरू आहे.

  • हिमवृष्टीमुळे रस्ते बंद पडले आहेत.

जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टला हिमवादळाचा तडाखा बसला आहे. तिबेटमधील माउंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील भागात हिमवादळामुळे हिमवृष्टी तीव्र झाली आहे. या हिमवादळामध्ये १००० गिर्यारोहक अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी बचावकार्य करण्यात येत आहे. ४,९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेल्या या प्रदेशातील रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांना परत येण्यासाठी पर्यायी रस्ते राहिले नाहीत. रस्त्यावर आलेला बर्फ काढण्यासाठी शेकडो स्थानिक ग्रामस्थ आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

हिमवादळामध्ये अडकलेल्या काही पर्यटकांना आधीच वाचवण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून सुरू झालेल्या हिमवृष्टीमुळे तिबेटमधील माऊंट एव्हरेस्टच्या पूर्वेकडील भागात हिमवृष्टी तीव्र झाली. माउंट एव्हरेस्ट गिर्यारोहकांसाठी प्रसिद्ध आहेत. माउंट एव्हरेस्टवर ट्रेकिंगसाठी मोठ्या संख्येने गिर्यारोहक येतात. हे शिखर जगातील सर्वात उंच असून ते ८८,८४९ मीटरपेक्षा जास्त उंचीचे आहे. हे शिखर चीनमध्ये माउंट कोमोलांगमा म्हणून ओळखले जाते.

नेपाळमध्ये पावसामुळे हाहाकार झाला आहे. पूर्व नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी भूस्खलन आणि पूर आला आहे. या ठिकाणी पावसामुळे घडलेल्या विविध घटनांमध्ये आतापर्यंत ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. सशस्त्र पोलिस दलाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी सकाळी १० ते रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत नोंदवलेल्या ३७ मृत्यूंपैकी सर्वाधिक मृत्यू कोशी प्रांतातील आहेत. याठिकाणी पूर, भूस्खलन, वीज पडणे आणि रस्ते अपघातांमुळे मृतांची संख्या वाढली आहे. तर नेपाळच्या सात प्रांतांपैकी पाच प्रांतांमध्ये म्हणजे कोशी, मधेश, बागमती, गंडकी आणि लुंबिनीमध्ये तुफान पाऊस पडत आहे.

शुक्रवारपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे पूर्व नेपाळमधील आठ प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. बागमती आणि पूर्व राप्ती नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आकाश निरभ्र झाल्यानंतर रविवारी सकाळपासून काठमांडूहून देशांतर्गत उड्डाणे पुन्हा सुरू झाली. खराब हवामानामुळे शनिवारपासून सर्व प्रांतांमधील विमान उड्डाणे बंद करण्यात आली होती. तर,पूरामुळे फटका बसलेल्या भागामध्ये नेपाळ लष्कर, नेपाळ पोलिस आणि सशस्त्र पोलिस दलाचे जवान बचावकार्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा

Cricketer Death : पहिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या महान क्रिकेटपटूचे निधन

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; मुंबई महापालिकेकडून शहरात १० टक्के पाणी कपात

Election: नगरपालिका, नगरपंचायतींवर यंदा 'लाडकी'ची सत्ता, कोणकोणत्या ठिकाणी असणार महिलाराज? वाचा संपूर्ण यादी

Maharashtra News : निवडणुकीआधी ‘गुलाबी पंचा’मुळे पुन्हा चर्चा, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा लूक आला समोर

SCROLL FOR NEXT