Delhi Crime News Saam Tv
देश विदेश

Crime: आईने पोटच्या २ मुलींना संपवलं, एकीची उशीने तर दुसरीची ओढणीच्या सहाय्याने हत्या; नंतर..., दिल्ली हादरली

Delhi Crime: दिल्लीमध्ये एका महिलेने पोटच्या दोन मुलींची हत्या केली. त्यानंतर तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी या महिलेचे प्राण वाचवले. तिने आपल्या दोन मुलींची हत्या का केली यामागचे कारण समोर आले नाही.

Priya More

Summary -

  • दिल्लीतील मालवीय नगरमध्ये भयंकर हत्याकांड

  • आईने पोटच्या दोन मुलींची हत्या केली

  • मुलींना संपवल्यानंतर आईचा आत्महत्येचा प्रयत्न

  • एका मुलीचा उशीने तर दुसऱ्या मुलीचा ओढणीने गळा आवळून हत्या

नवी दिल्लीच्या मालवीय नगरमध्ये हत्याकांडाची भयंकर घटना घडली. एका महिलेने आपल्या दोन मुलींची हत्या केली. त्यानंतर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेचे प्राण वाचवले. पण या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलेचे वय अंदाजे ५५ ते ६० दरम्यान असावे. तर तिने हत्या केलेल्या दोन्ही मुलींचे वय अनुक्रमे २८ आणि ३४ वर्षे असावे. या घटनेमुळे दिल्ली हादरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत ते महिलेचा जबाब नोंदवण्यासाठी तिच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत.

दिल्ली पोलिस सध्या महिलेच्या नातेवाईकांची देखील चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, ही घटना मालवीय नगरमध्ये घडली. पोलिसांना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास कॉल आला होता. महिलेच्या नवऱ्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली होती. त्याने पोलिसांना सांगितले होते की, घराचा दरवाजा उघड नाही आणि आतमधून कुणाचाच आवाज येत नाही.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडला तर आतमधील दृश्य खूपच भयावह होते. घरामध्ये एका मुलीचा मृतदेह सापडला तिच्या चेहऱ्यावर उशी होती. तर दुसऱ्या मुलीच्या गळ्याभोवती ओढणी होती. या दोन्ही सख्ख्या बहिणींची हत्या करण्यात आली होती.

पोलिसांनी घराच्या आतमधील खोलीमध्ये जाऊन पाहणी केली तर आतमध्ये एक महिला बेशुद्धावस्थेत पडली होती. त्या महिलेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासातून असे समोर आले की, महिलेने दोन्ही मुलींची हत्या करून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केला.

पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवले. क्राईम आमि फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिस आसपास राहणाऱ्या नागरिकांची चौकशी करत आहेत. पोलिस महिलेच्या शुद्धीवर येण्याची वाट पाहत आहेत. महिलेने मुलींची हत्या का केली? यामागचे कारण अद्याप समोर आले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी, वादाला कुठून सुरुवात झाली? बघा VIDEO

भाजप कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू; राजकीय वर्तुळात खळबळ

Mothers Day: उशीर होण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आईला हे ७ प्रश्न नक्की विचारा!

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी पेटवला कांदा

Mothers Day Special : तुमच्याही आईला फिरायला आवडतं? मदर्स डेला 'या' ५ बजेट फ्रेंडली ठिकणी नक्की घेऊन जा

SCROLL FOR NEXT