Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: माणुसकीला काळिमा फासणारी घटना! सासूचं सूनेसोबत भंयकर कृत्य, परिसरात खळबळ

Mother in Law Forces Daughter in Law to miscarriage: पीडित सून तिसऱ्यांदा गरोदर राहिली. यानंतर सासूनं तिसरी मुलगी नको, गर्भपात कर असं सासूनं सुनेला बळजबरी केली.

Bhagyashree Kamble

उत्तर प्रदेशच्या भदोहीमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर येत आहे. पुन्हा मुलगी जन्माला येऊ नये म्हणून एका सासूने सूनेचं बळजबरीनं गर्भपात केलं आहे. सध्या सूनेची तब्येत बिकट असून, सूनेला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून आरोपी महिलेसह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१७ साली लग्न झाल्यापासून, तिचा पती आणि सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी छळ केला जात होता. पीडित महिलेवर सातत्यानं अत्याचार सुरू होता. तसेच सूनेवर माहेरीहून एक लाख रूपये आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. पण सासरच्यांकडून तिचा खरा छळ सूनेनं दोन मुलींना जन्म दिल्यानंतर सुरू झाला. सासरच्या लोकांनी तिला रोज त्रास देण्यास सुरूवात केली.

दरम्यान, पीडित तरूणी तिसऱ्यांदा गरोदर राहिली. यानंतर सासूनं तिसरी मुलगी नको, गर्भपात कर असं सासूनं सुनेला बळजबरी केली. मात्र पीडित सुनेला हे अमान्य होतं. सासूनं सुनेला जबरदस्तीने गोळ्या खाऊ घातल्या, ज्यामुळे तिचा गर्भपात झाला. त्यानंतर पीडितेवर पुन्हा हुंड्यासाठी दबाव टाकण्यात आला आणि २१ मार्च २०२४ रोजी सुनेला दोन मुलींसह घरातून बाहेर काढण्यात आलं.

सुनेनं थेट आपलं माहेर गाठलं. तेथे कुटुंबीयांच्या मदतीनं तिने १३ एप्रिल २०२४ रोजी कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर कारवाई करत न्यायालयानं १७ डिसेंबरला पोलिसांना सासू, पती तसेच इतर ४ नातेवाईक आरोपींविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kidney Health Tips : जीमनंतर प्रोटीन पावडर खाल्ल्याने किडनीवर होऊ शकतो परिणाम, वेळेआधीच जाणून घ्या 'या' ६ गोष्टी नाहीतर....

Maharashtra News Live Update : चंद्रपुरात शिवसेनेची ताकद वाढवण्याचा निर्धार; उदय सामंतांच्या उपस्थितीत आढावा बैठक

Ind vs SL : भारत विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा, या खेळाडूंना मिळाली संधी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन १५ ऑगस्टला धावणार, रेल्वेमंत्र्यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Face Care: फक्त ३ दिवसांत स्किन होईल सॉफ्ट आणि ग्लोईंग; आजच ट्राय करा 'हा' घरगुती फेसपॅक

SCROLL FOR NEXT