Hizbul Commander Javed Arrest Saam Digital
देश विदेश

Hizbul Commander Javed Arrest: मोस्ट वॉन्टेड हिजबुलच्या कमांडरला दिल्लीत ठोकल्या बेड्या, काश्मीरमधील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग

Hizbul Commander Javed Arrest: जम्मू काश्मीरमधील अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सामिल असलेल्या हिजबुल मुजाहिदीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टूला दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

Sandeep Gawade

Hizbul Commander Javed Arrest

जम्मू काश्मीरमधील अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सामिल असलेल्या हिजबुल मुजाहिदीनचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जावेद अहमद मट्टूला दिल्लीत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या दहशतवादविरोधी पथकानेही कारवाई केली असून तो हिजबुलचा कमांडर होता. सरकारने त्याच्यावर १० लाख रुपयांचं बक्षिस ठेवलं होतं.

दरम्यान त्याच्या भावाने जम्मू काश्मिरमधील घराबाहेर तिरंगा फडकवला होता. त्याचे फोटो आणि व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. जावेद सोपोरचा रहिवाशी असून तो अनेकवेळा पाकिस्तानमध्ये जाऊन आला आहे. तसेच तो हिजबुलचा कमांडर होता. दरम्यान सुरक्षा यंत्रणांनी अलिकडच्या काळात हिजबुलच्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जावदेला अटक केल्यानंतर त्याच्याकडे पिस्तुल, मॅगजिन, चोरीची गाडी आढळून आली आहे. पोलिसांची हत्या आणि ग्रेनेड हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग असून त्याचे अनेक साथीदार भारतात कारवाया करून पाकिस्तानमध्ये आश्रय घेतात. त्यांचा पाकिस्तानमध्ये सध्या मुक्त संचार आहे. काश्मीरमधील कारवायांनंतर तो भूमीगत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे आणि पप्या शिंदे यांची एकत्रित चौकशी

UPI Payment : UPI वर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत पुढे ढकलला, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Egg : २ अख्खी अंडी की ५ अंड्यांचा पांढरा भाग, वजन कमी करण्यासाठी काय बेस्ट?

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Zodiac Signs : ऑक्टोबरमध्ये ग्रहांचा मोठा योग! या 3 राशींचे उजळणार भाग्य, नोकरीत होणार प्रगती

SCROLL FOR NEXT