Bharat Jodo Nyay Yatra: राहुल गांधींच्या नेतृत्वात निघणाऱ्या भारत न्याय यात्रेचं नाव बदललं

Bharat Jodo Nyay Yatra News: भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या या यात्रेला भारत जोडो न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे.
Bharat Jodo Nyay Yatra
Bharat Jodo Nyay YatraSaam Digital
Published On

Bharat Jodo Nyay Yatra

भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींच्या नेतृत्वात आता इंफाळ मणिपूर ते मुंबई दरम्यान 6713 किमी यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. १४ जानेवारीला सुरू होणाऱ्या या यात्रेला भारत जोडो न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं आहे. याआधी भारत न्याय यात्रा असं नाव देण्यात आलं होतं. मणिपूर (इंफाळ) मधून यात्रेला सुरुवात होणार असून यात्रेची सांगता मुंबईत होणार आहे. महाराष्ट्रात 5 दिवस यात्रा असून नंदुरबार, धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई अशा 6 जिल्ह्यातून यात्रा जाणार आहे. राहुल गांधींची ही यात्रा 66 दिवस यात्रा चालणार आहे. तर देशातील 110 जिल्ह्यातून यात्रेचा प्रवास असेल.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश, राज्य प्रभारी, राज्य युनिट प्रमुख आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांनी कार्यकर्त्यांना, काँग्रेसचा विजय सुनिश्चित करण्यासाठी मतभेत बाजूला ठेवण्याचा आणि माध्यमांमध्ये अंतर्गत मुद्दे उपस्थित न करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी न्याय यात्रेचं नाव बदलण्याची घोषणाही केली. या यात्रेदरम्यान राहुल गांधी तळागाळातील लोकांशी संवाद साधणार आहेत. त्याच्या समस्या अडचणी समजून घेणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रत्येक दिवशी दोन सभा होणार आहेत, शक्यतो या सभा कॉर्नर सभा असतील. काही ठिकाणी मोठ्या सभा होणार आहेत. महाराष्ट्रात मालेगाव, नाशिक, भिवंडी, मुंबई या ठिकाणी मोठी सभा होतील. तर BKC मुंबईत यात्रेची सांगता होण्याची शक्यता आहे.

Bharat Jodo Nyay Yatra
Railway Refund Rules Policy: ट्रेन उशीरा आली..घाबरून जाऊ नका, मिळेल पूर्ण परतावा, कसं ते जाणून घ्या

खर्गे म्हणाले, भाजप सरकार गेल्या १० वर्षातील आपलं अपयश लपवण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना नव्या उर्जेने पुढे येऊन काम करावं लागेल. अंतर्गत मतभेद बाजूला ठेवावे लागतील. टीकेत गुंतू नका, मीडियामध्ये अंतर्गत मुद्दे उपस्थित न करण्याचं आवाहन केलं. कॉंग्रेस अरुणाचल प्रदेश सोडत असल्याच्या वृत्ताचं यावेळी त्यांनी खंडण केलं. यापूर्वी १४ राज्य होती मात्र आता अरुणाचल प्रदेशचा समावेश करण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसात लोगो आणि थीम सॉन्ग लाँच करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

Bharat Jodo Nyay Yatra
Shocking News: नवऱ्याच्या मृतदेहासोबत महिलेचा ट्रेनमधून १३ तास प्रवास, तरीही कळले नाही; साबरमती एक्सप्रेसमधील प्रकार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com