Lok Sabha Election: PM मोदी यंदा रामेश्वरममधून निवडणूक लढवणार? दाक्षिणात्य राज्य फत्ते करण्यासाठी काय आहे BJP चा प्लान?

Pm Narendra Modi Latest News: पंतप्रधान मोदी रामेश्वरममधूनही निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
PM Narendra Modi will contest Rameswaram
PM Narendra Modi will contest RameswaramSaam Tv
Published On

PM Narendra Modi will contest Rameswaram:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपने नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 3 राज्यांमध्ये बहुमत मिळाले आणि सरकार स्थापन केले. यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. यातच भाजपची निवडणूक यंत्रणा पूर्णपणे सक्रिय झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन करणार आहेत. या माध्यमातून संपूर्ण देशात भाजपच्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Narendra Modi will contest Rameswaram
New DGP of Maharashtra: मोठी बातमी! राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, त्यांच्याबद्दल जाणून घ्या

राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की, भाजप राम मंदिर म्हणजेच सांस्कृतिक राष्ट्रवादाचा मुद्दा बनवून निवडणूक लढवणार आहे. या मुद्द्याद्वारे दक्षिणेतही प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान मोदी गेल्या दोन दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांच्या दौऱ्यावर होते. जिथे त्यांनी कोट्यवधी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले.  (Latest Marathi News)

पंतप्रधान मोदी सलग 2 वर्षांपासून काशी-तमिळ संगमचे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात आयोजन करत आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना दक्षिणेत विशेषतः तामिळनाडूमध्ये प्रवेश करायचा आहे, असं बोललं जात आहे. उत्तरेव्यतिरिक्त दक्षिणेकडील राज्यांमध्येही पक्षाला आपली मुळे मजबूत करायची आहेत. अशातच तामिळनाडू आणि केरळसाठी पक्षाने विशेष रणनीती बनवल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

PM Narendra Modi will contest Rameswaram
Amol Kolhe On Ajit Pawar: 'दगा देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार?', अमोल कोल्हे यांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

सूत्रांचं म्हणणं आहे की, पक्षाने तामिळनाडूतील रामेश्वरम मतदारसंघातून एका नेत्याला उभे करण्याची योजना आखली आहे, जो आसपासच्या सर्व जागांवर स्वबळावर प्रभाव टाकू शकेल. अशातच बनारस व्यतिरिक्त पंतप्रधान मोदी रामेश्वरममधूनही निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

यावेळी पक्षाला तामिळनाडूमधून10 जागा जिंकायच्या आहेत. यासाठी पक्ष पूर्ण जोर लावत आहे. नुकतेच पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डाही तामिळनाडूला पोहोचले होते. प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई संपूर्ण राज्यात पदयात्रा काढत आहेत. संसद भवनाच्या उद्घाटनावेळी दक्षिणेतील संतांनी पक्षाच्या नेत्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी सांगितले की, यावेळी पंतप्रधान मोदींनी रामेश्वरममधून निवडणूक लढवावी. जेणेकरून राज्यात पक्षाचा जनाधार वाढू शकेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com