Amol Kolhe On Ajit Pawar: 'दगा देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार?', अमोल कोल्हे यांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका

Amol Kolhe News: शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.
Amol Kolhe On Ajit Pawar
Amol Kolhe On Ajit PawarSaam Tv
Published On

Amol Kolhe On Ajit Pawar:

शरद पवार गटाचे नेते अमोल कोल्हे यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. 'गुरुंना दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार, असं ते म्हणाले आहेत. तसेच पक्ष आणि चिन्हाचं अपहरण केल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. शरद पवार गटाच्या मेळाव्यात बोलताना ते असं म्हणाले आहेत.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे म्हणाले आहेत की, ''प्रभू श्रीराम यांनी वनवास स्वीकारला, तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी. आपल्या गुरुंना दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना श्रीराम कसे पावणार हा महत्वाचा सवाल आहे.'' ते म्हणाले आहेत, रामायणात सीता मातेचं अपहरण झालं होतं. आताच्या कलयुगात महाराष्ट्रात पक्ष आणि चिन्हाचं हरण होत आहे.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amol Kolhe On Ajit Pawar
NCP Chintan Shibir : आरक्षण, मोदी सरकार, तपास यंत्रणा, निवडणुका आणि जागावाटप...; शरद पवार सगळ्याच मुद्दयांवर स्पष्ट बोलले

यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमोल कोल्हे म्हणाले की, ''अफजलखान स्वराज्यावर चालून आला तेव्हा तुळजापूरच्या मंदिरावर आक्रमण केले तेव्हा अफजलखानाच्या सैन्यात नाईकजी पांढरे, मुंबाजी भोसले, बाजी घोरपडे होते. एक एक मातब्बर सरदार होते जेव्हा अफजलखानाने घन उचलला तेव्हा या प्रत्येक सरदाराचे रक्त सळसळत होतं. प्रत्येकाचे मनगट शिवशिवीत होते, प्रत्येकाचा श्वास फुलला होता, पण बोलायची कुणालाच हिम्मत झाली नाही, कारण पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती. इतिहास कशी पुनरावृत्ती करतो ते बघा.'' (Latest Marathi News)

ते म्हणाले, ''जेव्हा अफजलखानाने घन उचललं तेव्हा पाठीवर वतनदारीची झूल पांघरली होती म्हणून एकालाही बोलायची हिम्मत झाली नाही इतिहासाची पुनरावृत्ती बघा. वेदांता, फॉक्सकॉन, डायमंड बोस, पाणबुडी, महानंदा हे प्रकल्प गेलेत; कांद्याची निर्यात बंदी झाली. पण, महाराष्ट्रातल्या एकाही नेत्याला मान वर करून केंद्राला विचारण्याची हिंमत झाली नाही''  

Amol Kolhe On Ajit Pawar
New DGP of Maharashtra: मोठी बातमी! राज्याच्या पोलिस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती, त्यांच्याबद्दल जाणून घ्या

कोल्हे पुढे म्हणाले, ''देशात ५५ वर्ष मान्य असलेला ब्रँड देशात ५५ वर्ष ज्या माणसाच्या शब्दावर, कर्तुत्वावर प्रत्येकाने पसंतीची मोहोर उमटवली ते शरद पवार आपल्याबरोबर आहेत, ही सगळ्यात मोठी ताकद आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com