अथांग सागरात चुकूनही काही अघटीत घडलं की शेकडो फूट खोल असलेलं पाणी सगळ्यांनाच गिळंकृत करतं. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 'मॉर्निंग मिडास' नावाच्या एका मालवाहू जहाजाला थेट जलसमाधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या कार्गो जहाजात तब्बल ३००० कार होत्या. या सर्व कार समुद्राच्या पाण्यात बुडाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 'मॉर्निंग मिडास' कार्गो शिपला आठवडाभरापूर्वी भर समुद्रात आग लागली होती. या दुर्घटनेमुळे जलवाहतूक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या जहाजावर तब्बल ३००० नव्याकोऱ्या कारची वाहतूक केली जात होती. हे महाकाय जहाज चीनहून मेक्सिकोला जात होतं. मात्र, मध्येच प्रशांत महासागरात असतानाच या जहाजाला अचानक आग लागली. ही आग विझविण्याचा प्रयत्न केला जात होता. पण ती विझविण्यात यश आलं नाही. परिणामी हे आता समुद्रात बुडालं आहे. ही दुर्घटना अलास्का येथे अलेउतियन द्वीप समुहाजावळ घडली आहे.
आग कशी लागली, जहाज कसं बुडालं?
'मॉर्निंग मिडास' हे व्यापारी जहाज मेक्सिकोला जात होतं. मात्र ३ जून रोजी या जहाजाला आग लागली. हे जहाज Adak Island पासून ४९० किमी दूर होते. त्यावेळीच या जहाजाला आग लागली होती. ही आग एवढ्या वेगानं पसरली की तिला पूर्णपणे विझविता आलं नाही. आगीचा भडका उडाल्यामुळे ते पुर्णपणे निष्क्रिय झालं. परिणामी आग लागल्याच्या काही दिवसांनंतर हवामान खराब झाल्यानं आणि जहाजात पाणी शिरल्यानं ते समुद्राच्या पाण्यात बुडालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज तब्बल ५००० मीटर खोल समुद्रात बुडालं आहे.
दरम्यान, या मालवाहू जहाजाला आग लागल्यानंतर जहाजातील क्रू मेंबर्सना वाचवण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. या मोहिमेत एकूण २२ क्रू मेंबर्सना वाचवण्यात यश आलं. जवळून जाणाऱ्या एका व्यापारी जहाजानं त्यांना सुरक्षितपणे वर काढलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.