Madhya Pradesh Saamtv
देश विदेश

MP Morena Crime News: जमिनीच्या वादातून घडलं भयंकर! एकाच कुटूंबातील ६ जणांची गोळ्या घालून हत्या; सात वर्षापूर्वीचा बदला...

MP Morena Firing: २०१४ मध्ये याच वादातून हत्या झाली होती. ज्यानंतर जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हे कुटुंब गावात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Gangappa Pujari

MP Morena Crime News: मध्य प्रदेशातील चंबळमध्ये जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. मुरैना जिल्ह्यात दोन कुटुंबात जमिनीवरून भांडण झाले. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या कुटूंबामध्ये वाद सुरू होता. ज्याने आज भयंकर रूप धारण केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण मुरैना जिल्ह्यातील लेपा गावातील आहे. गावात एका जागेवरून रणजीत तोमर आणि राधे तोमर या दोन कुटूंबांमध्ये वाद सुरू होता. याच वादातून आज एका कुटूंबाने दुसऱ्या कुटूंबावर जोरदार हल्ला चढवला. या घटनेत पिता-पुत्रासह एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

या गोळीबारात तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी 3 महिलांचाही रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला आहे. त्याचबरोबर या प्रकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

2014 मध्येही झाली होती हत्या..

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांमध्ये बराच काळ वाद सुरू होता. 2014 मध्येही जमिनीच्या वादातून या कुटुंबात खून झाला होता. त्यानंतर हे प्रकरण अधिकच तापले. दुसरीकडे आज दोन्ही बाजूंच्या वादात मोठा गोळीबार झाला. आज दोन्ही कुटूंबे आमनेसामने आल्यावर आधी जोरदार लाठीचार्ज, नंतर बंदुकीतून गोळीबार झाला. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण आहे.

2014 च्या घटनेनंतर राधे तोमर यांच्या कुटुंबाने गाव सोडल्याचे सांगितले जात आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कुटुंबीय पुन्हा गावात आले. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी हे कुटुंब आल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत आज राधे कुटुंबीयांनी रणजित तोमर यांच्या कुटुंबावर हल्ला केला. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : भाजपचं टेन्शन वाढलं, बिहारमध्ये जागावाटपावरून केंद्रीय मंत्री नाराज, थेट ऑफर धुडकावली

Maharashtra Live News Update: राहुल गांधी यांची नाशिक न्यायालयातील पुढील सुनावणी पुढे ढकलली

Aanandi Joshi : तिचं क्लिव्हेज किती डिप... मराठी गायिकेला पुण्यातील डॉक्टरचा आक्षेपार्ह मेसेज; नाव अन् पत्ता शोधून...

Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Nilesh Ghaywal Video : गुंड निलेश घायवळचा भाजपच्या राम शिंदेंसोबतचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT