Heavy rainfall expected in next 10 hours across 15 states saam tv
देश विदेश

Weather Update: पुढील १० तासात कोसळणार धुवांधार पाऊस; १५ राज्यांना पावसाचा हाय अलर्ट

Monsoon Rain Update: भारतीय हवामान विभागाने पुढील १० तासांत १५ राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय. पावसाच्या काही काळाच्या खंडानंतर, महाराष्ट्रातही मान्सूनचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

  • पुढील 10 तासांत 15 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज.

  • हवामान विभागाने अनेक भागांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.

  • महाराष्ट्रात 21 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र गेल्या आठवड्याभरापासून पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत पडलाय. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट सतावत आहे. शेतकरी मित्रांनो काळजी करू नका, हवामान विभागानं एक दिलासादायक बातमी दिली आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. २१ जुलैनंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पुढील १० तासांमध्ये १५ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाकडून तब्बल १५ राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय. पुढील दहा तासांमध्ये या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून या काळात ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या काळात मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असं आवाहनही भारतीय हवामान विभागाने केलंय.

कोणत्या राज्यांना हाय अलर्ट दिलाय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. उत्तर भारत आणि पूर्व भारतात पुढील १० तासांमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

महाराष्ट्रात पावसाची स्थिती काय?

जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने खंड घेतल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. २० जुलैपासून राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. पुढील काही तासांमध्ये मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Children High BP : लहान मुलांनाही होतो BP चा त्रास? डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती अन् लक्षणे

Crime : आधीच बलात्कार झालेल्या १३ वर्षांच्या पीडितेवर वकिलानेच केला अत्याचार, संपूर्ण देश हादरवणारी घटना

Maharashtra News Live Update: रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन

Weight Loss: वजन कमी करायचंय? मग सकाळी फक्त हा एक योगा नक्की करा, महिन्याभरात ६ किलो वजन होईल कमी

तुकाराम मुंढेंची आणखी एक धडाकेबाज कारवाई! प्रसिद्ध ब्लड बँकचा परवाना कायमचा रद्द

SCROLL FOR NEXT