

पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज
हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी रेड व ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि पाणी साचण्याची शक्यता
पुढील तीन तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या एका तासापासून मुंबईच्या पश्चिम उपनगरात अति मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. आता हवामान विभागाने वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार पुण्यासह महाराष्ट्रात पुढील तीन दिवस धो-धो पाऊस कोसळणार आहे.
कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र पुण्याच्या घाटमाथ्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. कोकण किनारपट्टी पुण्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवस पावसाच्या असल्याने घाटमाथ्याला अलर्ट असल्याने कोणीही पर्यटनसाठी जाऊ नये, अशा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. हवामान विभागानुसार ६ जुलैनंतर पावसाचा जोर कमी होईल.
धाराशिव जिल्ह्यात गेल्या अर्धा तासापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. जून महिना कोरडा गेल्यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अखेर पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे.पावसाने दमदार हजेरी लावल्याने खरीप पेरणीला देखील वेग येणार आहे.
मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या अलर्टचे तंतोतंत पालन करा. पुढील दोन दिवसांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि वादळं येण्याची शक्यता असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले
वसईच्या ग्रामीण भागातील मोरी गावात पूरस्थितीमुळे अडकलेल्या सुमारे ७० ते १०० नागरिकांचे सुरक्षित रेस्क्यू करण्यात आले.जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड आणि नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याची पाहणी केली. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि वालीव पोलिसांनी संयुक्तपणे हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले.
शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध भागांत झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत शहरात झाडपडीच्या एकूण २९ घटना घडल्या. या सर्व घटनांवर अग्निशमन दलाने तातडीने प्रतिसाद देत मदत व बचावकार्य पूर्ण केले असून, कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.