Monsoon 2026 Saam Tv
देश विदेश

Monsoon Update : ७२ तास महत्त्वाचे! १७ राज्यांत पाऊस धुमाकूळ घालणार; ८० किमी वेगाने वारे अन् ढगफुटीचा अंदाज, IMD चा अलर्ट

IMD weather alert for 17 states: भारतीय हवामान खात्याने १७ राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. या राज्यांसाठी ७२ तास महत्वाचे असणार आहे. कोण-कोणत्या राज्यांत कसा पाऊस पडणार वाचा...

Priya More
  • देशातील १७ राज्यांसाठी पुढचे ७२ तास महत्वाचे असणार आहेत

  • वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे

  • बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता.

  • काही भागांत ताशी ७० ते ८० किमी वेगाने वारे वाहू शकतात.

केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तो काही दिवसांतच महाराष्ट्रात धडकला. आता हळूहळू मान्सून इतर भागात सक्रीय होत त्याची पुढच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. देशातील १७ राज्यांसाठी पुढचे ७२ तास महत्वाचे असणार आहेत. या राज्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला असून ८० किमीच्या वेगाने वादळ धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.

बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी आर्द्रता, वादळसदृश्य परिस्थिती यामुळे हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील अनेक राज्यात तुफान पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने १७ राज्यांना पावसाचा अलर्ट जारी केला आहे. या राज्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस आणि सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. याठिकाणी ढगफुटीसदृश्य परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे या राज्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

हवामान खात्याने बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांसाठी पुढचे ७२ तास महत्वाचे असल्याचे सांगितले आहे. या राज्यांमध्ये मुसळधार पावसासह ७० ते ८० किमीच्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. या पावसादरम्यान अनेक ठिकाणी झाडं पडण्याची, वीज पुरवठा खंडीत होण्याची आणि भूस्खलन होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

हवामान खात्याने पुढे असे देखील सांगितले की, ११ जूननंतर देशभरामध्ये वाऱ्याचा वेग वाढू शकतो. १२ आणि १३ जूननंतर पावसाचा जोर देखील वाढण्याची शक्यता आहे. या काळामध्ये नागरिकांनी शेतीची कामं करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे या काळामध्ये नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर हवामान खात्याने काही राज्यांमध्ये धुळीचे वादळ येण्याचा अंदाज वर्तवला. त्यासोबत गारपिटीचाही धोका असू शकतो असे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

Maharashtra News Live Update: आंबेगावच्या पोषण आहारावर ग्रामस्थांचा आक्षेप; काळवाडीत धान्याचे सॅम्पल घेऊन तपासणी सुरू

Perfume Tips: महागडा परफ्यूम लावूनही काही वेळात सुगंध गायब होतोय? 'या' चुका टाळा, फ्रॅग्रन्स राहील दिवसभर!

Saturday Horoscope : मेहनीचं फळ मिळेल, ५ राशींचे भाग्य चमकणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT