Dark clouds signal approaching monsoon as India awaits relief from intense heat. saam tv
देश विदेश

Monsoon 2026 Update:भारतात मान्सून कधी दाखल होणार? उन्हाच्या कडाक्यातून कधी होणार सुटका?

Monsoon Arrival Time: हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मान्सून नेहमीप्रमाणे जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळ किनारपट्टीवर दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून आगमनानंतर हळूहळू तापमानात घट होईल असा अंदाज आहे.

Bharat Jadhav

  • मान्सून भारतात कधी दाखल होणार?

  • मान्सून आल्यानंतर उष्णतेपासून दिलासा मिळणार

  • महाराष्ट्रात मान्सून कधी येणार?

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ चालू आहे. एकीकडे उन्हाचा तीव्र चटका तर दुसरीकडे अवकाळी पावसाचा मारा राज्यातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याचदरम्यान हवामान विभागाने आज तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला. गेल्या काही दिवसापासून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. वाढलेल्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

पुढील महिन्यात तापमानात अजून वाढ होण्याचा अंदाज आहे. त्याचदरम्यान हवामान विभागाने उन्हाचे चटके सहन करणाऱ्यासांठी दिलासा देणारी बातमी दिली आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टने घामाच्या धारांनी बेजार झालेल्या नागरिकांना दिलासा दिला आहे.

यावर्षी मान्सून कधीपर्यंत भारतात दाखल होईल याबद्दलचा अंदाज वर्तवला आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच मान्सूनचे भारतात आगमन होईल, असा अंदाज युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदरनं वर्तवला आहे.

ECMWF अर्थात युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टनं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी मान्सूनचे लवकर आगमन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये २७ ते २९ मे दरम्यान भारतात मान्सून दाखल झाला होता. यावर्षीही मे च्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दक्षिण भारतात दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नैऋत्य मौसमी वारे सर्वात आधी भारताच्या अंदमान निकोबार बेटावर येतात. त्यानंतर केरळात दाखल होतात. अंदमान निकोबार बेटावर मान्सून १८ ते २५ मे यादरम्यान दाखल होण्याचा अंदाज आहे. २५ मे ते १ जून या कालावधी मान्सून पश्चिम आणि उत्तरेच्या दिशेने सरकू शकतो. दरम्यान महाराष्ट्रासह उत्तर आणि पूर्व भारतातील तापमानात वाढ झाली आहे. अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा ४३ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. पुढील काही दिवसांमध्ये तापमानात आणखी वाढ होईल. काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव असणार असून भारतीय हवामान विभागाने तापमान वाढवण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तपन भाई पटेल मेमोरेल हॉस्पिटलचं उद्घाटन

Copper Ring: 'या' ४ राशींसाठी तांब्याची अंगठी असते शुभ; समाजात वाढते प्रतिष्ठा, जीवनात येते सकारात्मकता

Comedian Death News: प्रसिद्ध कॉमेडियन काळाच्या पडद्याआड; वयाच्या ५० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jowar Bhakri Benefits: उन्हाळ्यात ज्वारीची भाकरी शरीराला कसं थंड ठेवते? वाचा फायदे

Paytm वर बंदी; आता तुमच्या पैशाचं काय होणार? RBI ने दिली महत्वाची माहिती! Fastag वरही अपडेट

SCROLL FOR NEXT