Health Tips : भटक्या कुत्रा चावला? वेळ वाया घालवू नका; हे उपाय तातडीने करा

Saam Tv

जखम लगेच धुवा

वाहत्या पाण्यात जखम किमान १५ मिनिटे खूप जास्त पाण्याने धुवा. साबण चोळणे टाळा.

street dog bite | pintrest

घरगुती उपाय करणे टाळा

अशावेळी घरगुती उपाय हे अधिक धोकादायक आहेत. मिरची, चुना, कोलगेट, वनस्पतीचा रस किंवा इतर घरगुती उपाय केल्याने जीवाला धोका निर्माण होईल.

street dog bite | pintrest

आयोडिनसयुक्त अँटीसेप्टिक

तात्पुरता उपाय म्हणून जखम धुतल्यानंतर घरात आयोडिनसयुक्त अँटीसेप्टिक उपलब्ध असेल तर ते लावावे.

street-dog-bite | pintrest

तातडीने डॉक्टरांकडे जा

कुत्र चावल्याने ओरखडा आला असेल किंवा रक्त आले असेल तर दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. जखम गंभीर असल्यास रेबीजचे किंवा टिटनसचे इंजेक्शन डॉक्टर देऊ शकतात.

street-dog-bite | pintrest

कुत्र्याची माहिती मिळवा

शक्य असल्यास तर कुत्रा पाळीव आहे का?, त्याचे रेबीज लसीकरण झाले आहे? का याची माहिती डॉक्टरांना द्या.

street-dog-bite | pintrest

दुर्लक्ष करू नका

कुत्र्याने चावलेच पाहिजे असे नाही , ओरखडा किंवा जखम झालेल्या ठिकाणी कुत्र्याची लाळ जरी पडली तरी रेबीजचा धोक असू शकतो. त्यामुळे दुर्लक्ष करू नका.

street-dog-bite | pintrest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

street-dog-bite | pintrest

Shravan Somvar : १६ सोमवार केल्याने काय पुण्य मिळते; जाणून घ्या मुली हा उपवास का करतात

Shravan Somvar : १६ सोमवार केल्याने काय पुण्य मिळते; जाणून घ्या मुली हा उपवास का करतात | meta ai
येथे क्लिक करा