Saam Tv
श्रावण सुरू झाला की सणांची चाहूल लागते. नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा यांसारखे सण साजरे केले जातात. याचसोबत श्रावणातले उपवास सुद्धा सुरू होतात .
श्रावण महिना शिवाचा प्रिय महिना आहे. असे मानले जाते. हा महिना शिवभक्तीसाठी श्रेष्ठ मानला जातो. त्यामुळे या महिन्यात शिवाला प्रसन्न करण्यासाठी १६ सोमवारचे व्रत केले जाते .
अविवाहित मुली चांगला वर मिळावा. वैवाहिक जीवन सुखी असावे यासाठी हा व्रत करतात.
पार्वतीने शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. त्याचेचे प्रतिबिंब म्हणून मुली हा उपवास करतात. अशी मान्यता आहे.
शंकराना आदर्श पती मानले जाते. प्रत्येक मुलीला पार्वतीसारखा सर्वगुण संपन्न पती मिळावा म्हणून इच्छा असते. त्यामुळे मुली हे व्रत करतात.
पतीच्या दिर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी विवाहित महिला देखील हा व्रत करतात.
१६ सोमवार या व्रताची सुरूवात श्रावण महिन्यापासून केली जाते. श्रावणाचा पहिला सोमवार ते १६ सोमवार पूर्ण होताच म्हणजेच जवळपास ४ महिन्यांनंतर व्रताची सांगता केली जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.