Saam Tv
मिरचीचे रोप कुंडीत सहज उगवते. सुकलेल्या मिरचीच्या बिया मातीत पेरा. योग्य ऊन आणि पाणी मिळाल्यास अडीच तीन महिन्यात ताजी मिरची मिळते.
टोमॅटोची लागवड कुंडी किंवा ग्रो बॅगमध्ये करता येते. या रोपाला भरपूर सूर्यप्रकाश आणि झाडासाठी आधाराची व्यवस्थित सोय केल्यास ६० ते ८० दिवसात टोमॅटो तयार होतात.
जेवणाची चव वाढवणारी कोंथिबीर किचन गार्डनमुळे तुम्हाला केव्हाही सहज मिळू शकते. धणे चुरून पसरट भांड्यात लावल्यास ३० ते ४० दिवसात कोथिंबीर तयार होते.
घरात कुंडीत पुदीना उगवणे अगदी सोपे आहे. पुदीन्याची तळाची पाने ओल्या मातीत लावा. काही दिवसातच मूळं फुटतील आणि नवे पाने येतील.
गच्चीवर किंवा कुंडीत पालक सहज आणि झटपट वाढवता येतो. बिया पेरताच ३ ते ४ आठवड्यातच पालक ही हिरवीगार भाजी तयार होते.
कमी जागेत लवकर उगवणारी भाजी म्हणजे मेथी. मेथीचे दाणे पाण्यात भिजवून, मातीत पेरल्यास अवघ्या ७ ते १० दिवसातच हिरवीगार मेथी तयार होते.
घरच्या घरी कढीपत्त्याचं रोप सहज लावता येत. थोडी माती आणि चांगला सूर्यप्रकाशामुळे काही दिवसातच कढीपत्ता तयार होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्या ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.