Saam Tv
चिकट तेलकट भागावर कोमट पाणी वापरू शकता. डाग जास्त चिकट असतील तर गरम पाण्यात भिजवलेला कपडा काही वेळ ठेवा. यामुळे चिकट डाग मऊ होतील.
डिशवॉश लिक्किड पाण्यात मिसळून किचन, प्लॅटफॉर्म, टाइल्स, कॅबिनेटवर लावा. ब्रश किंवा मऊ स्पंजने घासा.
जास्त चिकट डागांसाठी बेकिंग सोडा आणि थोडे पाणी मिसळून त्याची पेस्ट डागांवर लावा. मऊ स्पंजने घासून स्वच्छ करा.
थंड झाल्यावर गॅसचे बर्नर डिशवॉश लिक्किड लावून स्वच्छ करा. पण बर्नरच्या छिद्रांमध्ये पाणी जावू देऊ नका.
कॅबिनेटसुद्धा डिशवॉशच्या पाण्याने स्वच्छ करा. कडेने साचलेली घाण छोट्या ब्रशच्या मदतीने स्वच्छ करा.
सिंक आणि नळाभोवती हलके पिवळे किंवा हिरवे शैवाल जमते. यावर डिशवॉश टाकून स्वच्छ करा. मऊ स्पंजने न घासता काथ्याने घासा.
तेलकटपणा साचू नये म्हणून किचनमध्ये एक्झॉट फॅन किंवा खिडकी असुद्या. त्यामुळे तेलकटपणा किचनच्या टाईल्सवर जमा होत नाही.