Saam Tv
खिडक्या आणि मोकळ्या असलेल्या जागेवर बारीक जाळी लावा. यामुळे पाल आणि इतर छोटे किडे कीटक घरात येणार नाही.
पाल ही कीटक खाते आणि कीटक लाईट असेल तिथे जमा होतात. त्यामुळे अनावश्यक दिवे बंद करा.
घरात डास, माश्या, किडे जमा होतात. ते खाण्यासाठी पाल घरात येते. त्यामुळे असे कीटक वाढणार नाही याची काळजी घ्या .
अन्नाचे कण, उरलेले पदार्थ आणि सांडलेले खाद्यपदार्थ लगेच साफ करा. रात्री सिंक आणि किचन प्लॅटफॉर्म स्वच्छ करा .
ओलाव्यामुळे पालींची संख्या वाढते. त्यामुळे गळणारे नळ, पाइप वेळीच दुरूस्त करा. घरात कोरडेपणा असूद्या.
धूळखात पडलेल्या वस्तू, अडगळीच्या जागा स्वच्छ करा. पालींना लपण्यासाठी जागा ठेऊ नका.
कुजलेल्या कचरा, नको असलेले अन्न जास्त वेळ न ठेऊ नका. घरात नियमित स्वच्छता ठेवा.