Monsoon Latest Marathi News Saam Tv
देश विदेश

Monsoon 2023 Update: आला रे आला...! अखेर मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?

IMD Alert: मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.

Priya More

Monsoon In Keral: मान्सूनची (Monsoon 2023) आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल (Monsoon In Kerala) झाला आहे. भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. जवळपास एक आठवडा उशीराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे देशभरातील जनतेसोबतच शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 'नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. केरळच्या अनेक भागांमध्ये आज सकाळपासून पावसाला सुरूवात झाली. दरवर्षी मान्सून 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो. पण यावर्षी मान्सूनचे आगमन होण्यासाठी तब्बल एक आठड्याचा कालावधी लागला. मान्सूनने केरळमध्ये दाखल होण्यासाठी 8 जूनची तारीख गाठली. आता हळूहळू मान्सून पुढे सरकरत सक्रीय होईल.

मान्सून आज केरळमध्ये दाखल झाला असून तो लवकरच महाराष्ट्रात दाखल होईल. मान्सून तळकोकणात 16 जून किंवा त्यानंतरच दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सूनच्या आगमनामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आता मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होतोय याची सर्वजण वाट पाहत आहेत.

दरम्यान, यावर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास लांबला. या चक्रीवादळाच्या परिणामामुळेच मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी उशीर होत असल्याचे हवामान खात्याने सांगितले होते. आता मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला आहे. आता शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT