कोरोनानंतर आता देशात Monkeypox चा धोका; जाणून घ्या लक्षणे  Saam Tv
देश विदेश

चिंता वाढली! ६७ देशांमध्ये पसरला Monkeypox; युरोपमध्ये २ आठवड्यात ३ पट रुग्ण वाढले

जगात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: कोरोनानंतर आता जगावर मंकीपॉक्सचे (Monkeypox) संकट वाढले आहे. युरोपमध्ये ३ पटीने रुग्णांची संख्या वाढली आहे. डब्लूएचओने युरोपमध्ये मंकीपॉक्सचा वाढता प्रसार थांबवण्याचे आव्हान केले आहे. गेल्या दोन आठवड्यात रुग्णसंख्या तिप्पट झाली आहे. जागतिक आरोग्य नेटवर्कने मंकीपॉक्स व्हायरला जागतिक महामारी म्हणून घोषित केले आहे, पण डब्लूएचओ (WHO) ने सध्या याला जागतिक महामारी घोषित करण्यास नकार दिला आहे. १५ जूनपासून युरोपमध्ये मंकीपॉक्सच्या रुग्णांत तिप्पटीने वाढ झाली आहे.

६ मे रोजी ब्रिटनमध्ये मंकीपॉक्स व्हायरसचा रुग्ण आढळला आहे, आतापर्यंत युरोपमध्ये ५,००० हून अधिक रुग्ण आढळली आहेत. इतके रुग्ण ओळखले आहेत. आतापर्यंत ६७ देशांमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यातील ६,२२९ रुग्णांची टेस्ट झाली आहे. यातील ६,१७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर ५२ रुग्ण संशयास्पद आहेत. (monkeypox latest news)

युरोपमध्ये मंकीपॉक्सचे ५,२६२, उत्तर अमेरिकेत ६९२, दक्षिण अमेरिकेत ९२, आशियामध्ये ६४, आफ्रिकेत ३५ आणि ओशनियामध्ये १२ रुग्ण आढळले आहेत. मंकीपॉक्सचा १० देशांमध्ये जास्त प्रसार झाला आहे. यामध्ये ब्रिटन, स्पेन, अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, पोर्तुगाल, कॅनडा, नेदरलँड्स, इटली आणि बेल्जियम या देशांचा समावेश आहे.

शास्त्रज्ञांनी लंडनमध्ये राहणाऱ्या मंकीपॉक्सच्या (Monkeypox) ५४ रुग्णांची तपासणी केली. हे सर्व समलैंगिक होते. यापैकी फक्त २ रुग्णांना ते संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्याची कल्पना नव्हती, अस लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात समोर आले आहे.

युरोपमध्ये मंकीपॉक्सला रोखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागणार आहेत. यासाठी आम्ही आव्हान करतो. सर्वांनी काळजी घेऊन मंकीपॉक्सला रोखले पाहिजे, असं डब्लूएचओचे (WHO) प्रादेशिक संचालक हान्स हेन्री क्लुगे म्हणाले.

या आजाराचा प्रसार रोखायचा असेल तर तातडीने आणि समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे. मंकीपॉक्सचे (Monkeypox) रुग्ण हजारोपर्यंत पोहोचलेले बहुतेक देश युरोपमधील आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला मंकीपॉक्सचे रुग्ण वाढले आहेत या प्रसाराबद्दल चिंता वाटत असल्याचे डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस म्हणाले.(monkeypox latest news)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT