Monkeypox Saam Tv
देश विदेश

काळजी घ्या! दिल्लीत आणखी एक मंकीपॉक्स संशयित रुग्ण; राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना

संशयित रुग्णाने बाहेरच्या देशाचा प्रवास केला आहे.रुग्णाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: दिल्लीत मंकीपॉक्सचा (Monkeypox) आणखी एक संशयित रुग्ण आढळला आहे. रुग्णाला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या व्यक्तीच्या त्वचेवर पुरळ येणे आणि ताप येणे यासारखी विषाणूची लक्षणे आहेत. रुग्णाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रुग्णाचा अहवाल आलेला नाही. देशात मंकीपॉक्सचे एकूण चार रुग्ण समोर आली आहेत.

संशयित रुग्ण परदेशात जाऊन परत आल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णाचे नमुने पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे पाठवण्यात आले आहेत. दिल्लीतून मंकीपॉक्सची (Monkeypox) लागण झालेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीला त्रास होत असल्याचे सांगितले आहे. या रुग्णाला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.

देशात आतापर्यंत मंकीपॉक्सचे (Monkeypox) चार रुग्ण सापडले आहेत. यापैकी तीन केरळमध्ये तर एक दिल्लीत सापडला आहे. दिल्लीत सापडलेला पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण रुग्णालयात दाखल आहे. त्याच्या त्वचेवर आलेले पुरळ आणि जखमा बऱ्या होण्यासाठी आणखी किमान एक आठवडा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे मंकीपॉक्स संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना अलर्ट जारी केला आहे.

मंकीपॉक्स प्रकरणी WHO ची मोठी घोषणा!

गेल्या दोन वर्षांत जगभरातील बहुतेक देशांमध्ये, कोरोनाव्हायरस संसर्गाने हाहाकार माजवला आहे. अनेक देश अजूनही या विषाणूपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, त्यात्याच आता मंकीपॉक्सच्या (Monkeypox) वाढत्या प्रकरणांमुळे जगभरात चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सची प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनानंतर मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. यासोबतच WHO ने मंकीपॉक्सबाबत हाय अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ WHO आता मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून पाहत आहे. मंकीपॉक्स व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी तात्काळ पाऊल उचलण्याची आवश्यकता आहे. 70 देशांहून अधिक ठिकाणी मंकीपॉक्सची रुग्णसंख्या जास्त आहेत. त्यातच भारतातही तीन रुग्ण आढळले आहे.

मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव पाच देशांमध्ये सर्वाधिक पसरला आहे. स्पेनमध्ये सर्वाधिक 3125 लोक आहेत. यानंतर अमेरिकेत 2890, जर्मनीमध्ये 2268, ब्रिटनमध्ये 2208 आणि फ्रान्समध्ये 1567 रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharli Gilki Recipe: गिलक्याची भाजी आवडत नाही? मग एकदा ट्राय करा झणझणीत भरली गिलकी, शुन्य मिनिटांत जेवण होईल फस्त

Balushahi Recipe: झटपट घरीच बनवा खुसखुशीत आणि रसाळ बालूशाही, वाचा सोपी रेसिपी

Pune Crime: पुण्यात धावत्या कारमध्ये महिलेवर बलात्कार; कोरेगाव पार्क परिसरातील मध्यरात्रीच्या थराराने खळबळ

मोठी बातमी! राज्यमंत्र्याचे निधन, भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर; राजकीय वर्तुळात शोककळा

Breast cancer: शरीरात ही 8 लक्षणं दिसली तर समजा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो

SCROLL FOR NEXT