Monkeypox : मंकीपॉक्स विषाणूचा जगभरात प्रार्दुभाव वाढताना दिसतोय, आतापर्यंत कांगोमध्ये ४५० जणांचा या आजाराने मृत्यू झालाय. आता हा आजार पाकिस्तानपर्यंत (Pakistan) येऊन ठेपला आहे. भरात सरकारनेही सुरक्षेची पावले उचलली आहे. गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने मंकीपॉक्स ही जागतिक आणीबाणी असल्याचे जाहीर केले. मंकीपॉक्स (MPox) हा आजार अनेक देशात पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सर्वांनाच सावधगिरीचा इशारा दिला आहे. मंकीपॉक्स हा आजार अनेक कारणामुळे पसरतोय. प्राणी ते माणूस अन् माणूस ते माणूस.. असा त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. हा आजार शरीरसंबंध ठेवल्यामुळेही पसरत असल्याचे समोर आलेय. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत माहिती दिली.
जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलेय की, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये पहिल्यांदा शरीरसंबंध ठेवल्यानंतर संक्रमित झालेला रुग्ण आढळला होता. त्यानंतर शरीरसंबंध ठेवल्यानंतर मंकीपॉक्स पसरत असल्याचं स्पष्ट झाले. आफ्रिका देश कांगोमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात मंकीपॉसचा प्रभाव दिसत आहे. आतापर्यंत येथे ४५० जणांचा मृत्यू झालाय. याआधी आफ्रिकेतील वैज्ञानिकांनी हा आजार रोखणं कठीण असल्याचं सांगितले होते.
संयुक्त राष्ट्राच्या आरोग्य एजन्सीने गुरुवारी रात्री याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले की, बेल्जियमचा एक व्यक्ती मार्चमध्ये काँगोला गेला होता आणि त्यानंतर लगेचच त्याला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले. संक्रमित व्यक्ती समलिंगी आहे आणि त्याचे काँगोमधील अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध होते. त्यातूनच त्याला मंकीपॉक्सची लागण झाली. पण त्यानंतर बेल्जियमच्या माणसासोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणखी पाच जणांनाही मंकीपॉक्सची लागण झाल्याचे समोर आले आहे.
लैंगिक संबंधांमुळे आफ्रिकेतील मंकीपॉक्स पसरल्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी लैंगिक संबंधातून मंकीपॉक्स पसरत असल्याचा दावा फेटाळण्यात आला होता. मंकीपॉक्स गेल्या अनेक दशकांपासून मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत महामारी बनली आहे. शरीरसंबंधामुळे मंकीपॉक्स पसरत असल्याचे समोर आलेय, असेय डब्ल्यूएचओ सल्लागार आणि नायजेरियन विषाणूशास्त्रज्ञ ओयेवाले टोमोरी यांनी सांगितले.
गे, बायसेक्शुअल लोकांनी मंकीपॉक्सच्या साथीच्या काळात काळजी घ्यावी. पुरुष समलिंगी मंडळींनी आपल्या लैंगिक जोडीदारांची संख्या कमी करावी, एखादा नवा लैंगिक जोडीदार निवडायचा असेल तर आधी त्याची सविस्तर माहिती मिळवावी. त्यात त्याच्या आरोग्याचाही तपशील आलाच, असे काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितले होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.