One Nation, One Election Saam Tv
देश विदेश

One Nation, One Election: हिवाळी अधिवेशनातच सादर केलं जाणार ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक?

One Nation, One Election Bill : रामनाथ कोविंद समितीने एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी मार्चमध्ये आपल्या शिफारशी सरकारला सादर केल्या होत्या.

Bharat Jadhav

वन नेशन आणि वन इलेक्शन प्रकरणी रामनाथ कोविंद समितीने आपल्या शिफारशी केल्या होत्या. केंद्र सरकारने काही काळापूर्वी या समितीच्या शिफारशी स्वीकारल्या. समितीने आपल्या अहवालात दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची शिफारस केलीय. केंद्रातील नरेंद्र मोदींच्या सरकार एक देश एक निवडणूक लागू करण्याप्रकरणी सक्रिय आहे. सरकार यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. संसदेच्या सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातच सरकार 'एक देश एक निवडणूक'शी संबंधित विधेयक आणू शकते, अशी माहिती सुत्रांनी दिलीय.

'वन नेशन वन निवडणुकी'च्या विधेयकावर चर्चा करण्यासाठी सरकार हे विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात येऊ शकते. या विधेयकावर एकमत व्हावे, अशी सरकारची इच्छा आहे. त्यासाठी सर्व संबंधितांशी सविस्तर चर्चा केली जाईल. जेपीसी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी या विधेयकासंबंधी चर्चा केली जाणार आहे. तसेच या चर्चेसाठी सर्व राज्यातील विधानसभा अध्यक्षांना बोलवण्यात येऊ शकते. देशभरातील जाणकारांसह नागरी समाजाचेही मत याबाबत घेतले जाण्याची शक्यता आहे.

मागील कार्यकाळात सरकारने सप्टेंबर 2023 मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेवर काम करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती. कोविंद समितीने लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याआधी मार्च महिन्यात आपल्या शिफारशी सादर केला होत्या. केंद्र सरकारने काही काळापूर्वी समितीच्या शिफारशी स्वीकारल्या.

समितीने आपल्या अहवालात दोन टप्प्यात निवडणुका घेण्याची शिफारस केलीय. समितीने पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्याची शिफारस केलीय. तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेण्याचं सांगितलंय.

नागरी निवडणुकांसाठी 50 टक्के पाठिंबा आवश्यक

प्रस्तावित घटनादुरुस्ती विधेयकांपैकी एक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभेशी जोडण्यासाठी किमान 50 टक्के राज्यांचा पाठिंबा आवश्यक आहे. कलम ३२७ मध्ये सुधारणा करून त्यात ‘एक देश, एक निवडणूक’ हे शब्द समाविष्ट केले जातील. यासाठी ५० टक्के राज्यांच्या पाठिंब्याची गरज भासणार नाही.

घटनात्मकदृष्ट्या, निवडणूक आयोग आणि राज्याच्या निवडणुका या दोन्ही स्वतंत्र संस्था आहेत. निवडणूक आयोगाला राष्ट्रपती, उपाध्यक्ष, लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा आणि राज्य विधानपरिषदांच्या निवडणुका घ्यायच्या असतात. तर राज्य निवडणूक आयोग त्यांच्या राज्यातील नगरपालिका आणि पंचायतींच्या निवडणुका घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT