
Cash found from Parliament seat : काँग्रेस खासदाराच्या बाकावर ५०० रूपयांच्या नोटांचं बंडल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यामुळे राज्यसभेत गदारोळ सुरू झाला आहे. थोड्यावेळासाठी राज्यसभा तहकूब करण्यात आली. राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार मनु सिंघवी यांच्यावर आरोप लावला. मनु सिंघवी यांनी आरोप फेटाळून लावले. याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
राज्यसभेच्या 222 क्रमांकच्या बाकाखाली ५०० रूपायांच्या नोटांचं बंडल सापडले. काँग्रेस खासदार अभिषेक मनू सिंघवी या बाकावर बसतात, त्यांच्यावर सभापती धनकड यांनी गंभीर आरोप केला. धनखड यांच्या या दाव्याचा काँग्रेस खासदारांनी सभागृहात निषेध केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी चौकशीपूर्वी नावे घेऊ नये, असा टोला लगावला.
संसदेत पैशांचं बंडल सापडले, ही घडलेली घटना निंदनीय आहे. ही अतिशय गंभीर घटना आहे. हे राज्यसभेच्या रेकॉर्डवर घेण्यात यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे. त्याशिवाय सत्य समोर येणार नाही, असे नड्डा म्हणाले.
या प्रकरणाची सखोल चौकशी होईल, याची मला खात्री आहे. २२२ नंबरच्या सिटवर हे पैसे सापडले आहेत, असेही नड्डा म्हणाले.
राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी याप्रकरणी काँग्रेसवर गंभीर आरोप केला. काँग्रेस खासदाराच्या खुर्ची खाली ५०० रुपायांचे बंडल सापडले. या नोटा खऱ्या की खोट्या याचा तपास केला जात आहे. पैशांच्या नोटांचं बंडल सापडल्यामुळे एकच गोंधळ उडालाय.
काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्व आरोप फेटाळले. काल मी फक्त ३ मिनिट सदनात (राज्यसभेत) बसलो होतो. ते पैसे माझे नाही. काल माझ्याकडे फक्त ५०० रुपयांची नोट होती. या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे, असे मनु सिंघवी यांनी सांगितले.
मी जेव्हाही राज्यसभेत जातो तेव्हा 500 रुपयांची नोट घेऊन जातो, याबद्दल मी पहिल्यांदाच ऐकले आहे. गुरूवारी 12.57 वाजता सभागृहात पोहोचलो होते. त्यानंतर तीन मिनिटांनी सभागृह बरखास्त करण्यात आले. त्यानंतर मी अयोध्येचे खासदार अवधेश प्रसाद यांच्यासोबत दुपारी दीड वाजेपर्यंत कॅन्टीनमध्ये बसून संसदेतून बाहेर पडलो, असे मनु सिंघवी यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.