modi government and Small Savings Schemes 
देश विदेश

Small Savings Schemes: नवीन वर्षाच्या आधीच मोदी सरकारचं नागरिकांना गिफ्ट; 'या' योजनेच्या व्याजदरात होणार चांगली वाढ

Vishal Gangurde

Small Savings Interest rates changed :

केंद्र सरकारने नववर्षानिमित्त नागरिकांना मोठी भेट दिली आहे. नववर्षाच्या आधीच शुक्रवारी सरकारने जानेवारी-मार्च २०२४च्या तिमाहीत सुकन्या समृद्धी योजना (SSY), ३ वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. (Latest Marathi News)

मीडिया वृत्तानुसार, एका अधिसूचनेत केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटलं की, सुकन्या समृद्धी योजना आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर अल्प बचत योजनेचा व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजना व्याजदर ८.२ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा व्याजदर ७.१ टक्के इतका करण्यात येणार आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर आधी ८ टक्के होता. तीन वर्षांच्या मुदत ठेवीचे व्याज ७.१ टक्के होते. दुसरीकडे पीपीएफच्या व्याजदरात गेल्या तीन वर्षांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

'पीपीएफ'च्या व्याजदरातही केली होती घट

'पीपीएफ'च्या व्याजदरात एप्रिल-जून २०२० साली बदल केले होते. त्यानंतर गेल्या वर्षांत ७.९ टक्क्यांनी कमी करून ७.१ टक्क्यापर्यंत आणला. केंद्र सरकारने मागच्या ५ वर्षांत आरडी स्किममध्येही बदल केलेले नाहीत.

जानेवारी-मार्च २०२४ साठी व्याजदर

पोस्ट ऑफिस बचत योजना - ४ टक्के

एक वर्षासाठी मुदत ठेव योजना - ६.९ टक्के व्याजदर

२ वर्षांसाठी मुदत ठेव योजना - ७.० टक्के व्याजदर

३ वर्षांसाठी मुदत ठेव योजना - ७.१ टक्के व्याजदर

५ वर्षांसाठी मुदत ठेव योजना - ७.५ टक्के व्याजदर

५ वर्षांसाठी आरडी योजना - ६.७ टक्के व्याजदर

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राचे व्याजदर - ७.७ टक्के

किसान विकास पत्राचे व्याजदर - ७.५ टक्के

सर्वाजनिक भविष्य निधीचा (PPF) - ७.१ टक्के व्याजदर

सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज - ८.२ टक्के

ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे व्याज - ८.२ टक्के

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

Maggi Dosa Recipe : मुलांना टिफीनमध्ये द्या झटपट बनवलेला मॅगी डोसा; वाचा 5 मिनिटांत तयार होणारी रेसिपी

Palghar Crime: निर्मात्याकडून अश्लील मेसेज अन् छेडछाड; २६ वर्षीय अभिनेत्रीची पोलिसात तक्रार, मुंबईमधील धक्कादायक प्रकार

Bigg Boss Marathi : संग्रामला टोला, अरबाजचं तोंडभरून कौतुक; उत्कर्ष शिंदे काय म्हणाला ?

SCROLL FOR NEXT