Narendra Modi news Saam tv
देश विदेश

मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होणार; किती जणांचं मंत्रिपद जाणार?

BJP Government: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. मोदी सकरकारच्या कॅबिनेटमधील काही मंत्र्यांचं पद जाण्याची शक्यता आहे.

Vishal Gangurde

पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये होणार फेरबदल

कॅबिनेटमधील १२ मंत्र्यांचं पद जाण्याची शक्यता

फेरबदलाच्या शक्यतेने राजकीय वर्तुळात खळभळ

देशाच्या राजकारणातून मोठी बातमी हाती आली आहे. भाजपने देशातील ४ राज्यात नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. फेरबदलच्या शक्यतेमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

देशात १८ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे. सध्या मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये असलेल्या काही नेत्यांचंही मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. जवळपास १२ जणांचा पत्ता कट होणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे नितीन नबीन हे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नव्या टीमची घोषणा करू शकतात. संघटन आणि सरकारमध्ये चांगला ताळमेळ व्हावा, यासाठी कॅबिनेटमध्ये बदल करण्याची रुपरेखा आखली जात आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने पंजाब, हरियाणा, त्रिपुरात आणि दिल्लीत नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली.

दिल्लीत केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्याकडे कमान सोपवली आहे. तर २०२५ मध्ये केंद्रीय मंत्री पंकज चौधरी यांची उत्तर प्रदेशच्या भाजप अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

तत्पूर्वी, देशात १८ जून रोजी राज्यसभेच्या २४ जागा आणि १ पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपच्या आमदारांच्या संख्येनुसार १० उमेदवार जिंकणे निश्चित मानले जात आहेत. गुजरात ४, राजस्थान २, मध्य प्रदेश २, मणिपूर १ आणि अरुणाचल प्रदेशात १ जागा जिंकण्याची शक्यता आहे. ओडिशातील पोटनिवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. कारण याच महिन्यात त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रवनीत सिंह बिट्टू यांना पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त|Ashadhi Ekadashi

'मोठी घोषणा',अमोल कोल्हेंच्या पोस्टने खळबळ; राजकारण की नवी मालिका?

Maharashtra News Live Update: पुण्यात गादी कारखान्याला आग

Children's Health: शाळा सुरू होताच मुलांच्या आरोग्याचा धोका वाढला; तज्ज्ञांनी पालकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Bus Accident: भीषण अपघात! बस खोल दरीत कोसळून 40 जणांचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी

SCROLL FOR NEXT