Tomato Price in Maharashtra Saam TV
देश विदेश

Tomato Price In India : सरकारचा मोठा निर्णय, टॉमेटो प्रतिकिलो ४० रुपयांवर; सर्वसामान्यांना दिलासा

Tomato prices drop : गेल्या दोन महिन्यांपासून महागाईनं सर्वसामान्यांना अक्षरशः घाम फोडला आहे.

Nandkumar Joshi

Tomato prices drop : गेल्या दोन महिन्यांपासून महागाई आकाशाला भिडली आहे. सर्वसामान्यांना महागाईनं अक्षरशः घाम फोडला आहे. दोन महिन्यांपूर्वी टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत पोहचला होता. पण सरकारनं महागाईनं पिचलेल्या सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. उद्यापासून (20 ऑगस्ट) देशभरात टॉमेटो प्रतिकिलो ४० रुपयांनी विकला जाणार आहे.

टॉमेटोच्या वाढत्या किंमतीला ब्रेक लागला आहे. सर्वसामान्याच्या अवाक्याबाहेर गेलेला टॉमेटो पुन्हा किचनमध्ये दिसू लागला आहे. देशात टॉमेटोचा भाव प्रतिकिलो ३०० रुपयांवर पोहोचला होता. पण गेल्या १४ जुलैपासून सरकारने आखलेल्या योजनेनुसार, स्वस्तात टॉमेटो विक्री केला जात आहे. सुरुवातीला ९० रुपये किलो, नंतर ५० रुपये आणि उद्यापासून ४० रुपये किलोने टॉमेटो विकला जाणार आहे. (Latest Marathi News)

पीटीआयच्या वृत्तानुसार, केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशानुसार, घाऊक आणि किरकोळ बाजारात टॉमेटोच्या किंमतीत घसरण झाली असतानाच, सहकारी संस्था एनसीसीएफ आणि नाफेड २० ऑगस्टपासून ४० रुपये प्रतिकिलोने टॉमेटो विक्री करणार आहे.

सरकारचा फॉर्म्युला यशस्वी

सरकारकडून दुसऱ्या उत्पादक राज्यांतून टॉमेटो खरेदी करून दिल्ली एनसीआरसह अन्य राज्यांत स्वस्तात विक्री करण्याची योजना आखली होती. ग्राहक व्यवहार विभाग, एनसीसीएफ, नाफेडने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांतून टॉमेटो खरेदी करून ज्या राज्यांत टॉमेटोचा भाव गगनाला भिडला होता, त्या ठिकाणी विकला. रिपोर्टनुसार, १४ जुलैपासून आतापर्यंत नाफेड आणि एनसीसीएफने देशात १५ लाख किलो टॉमेटो खरेदी करून तो स्वस्तात विकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कौटुंबिक वादातून पत्नीची पतीकडून हत्या; परिसरात खळबळ|VIDEO

Asambhav: प्रेम आणि रहस्यांनी भरलेला 'असंभव'; मुक्ता बर्वे, प्रिया बापट आणि सचित पाटील दिसणार थरारक रुपात

Wednesday Horoscope: 'या' ४ राशींसाठी बुधवार दिवस सोन्यासारखा; वाचा खास राशीभविष्य

Sara Ali Khan: सारा अली खानचा झक्कास लूक, नजरेने सौंदर्याला लावले चारचाँद

Uddhav and Raj Thackeray Together Again: ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार, कधी अन् कुठे? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT