Petrol Diesel Price Today (19 Aug): कुठे स्वस्त तर कुठे महाग; तुमच्या शहरातील पेट्रोल आज कितीने घसरले?

पेट्रोल ९६.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८ पैशांनी वाढलं असून ९२.२५ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.
Petrol Diesel Price Today
Petrol Diesel Price TodaySaam TV
Published On

Petrol Diesel Price: दररोज सकाळी ६ वाजता कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या किंमतीत WTI क्रूड ऑइल आणि ब्रेंट क्रूड ऑइल या दोन्हींच्या किंमती काही प्रमाणात वाढल्यात. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत ०.८१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइल प्रति बॅरल ८४.८० वर पोहचले आहे. (Latest Marathi News)

शनिवारी काही शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती घसरल्यात. तर काही ठिकाणी दर वाढले आहेत. आग्रामध्ये पेट्रोल आणि डिझेल २५ पैशांनी महागलं आहे. पेट्रोल ९६.६३ आणि डिझेल ८९.८० रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. अहमदाबादमध्ये पेट्रोल ९ पैशांनी महागलं आहे. पेट्रोल ९६.५१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८ पैशांनी वाढलं असून ९२.२५ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. नोएडामध्येही पेट्रोल-डिझेल ७ पैशांनी महागलंय पेट्रोल ९६.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.८२ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे.

Petrol Diesel Price Today
Mumbai-Goa Highway Traffic : मुंबई-गोवा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी; 6-7 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

अजमेरमध्ये पेट्रोल २४ आणि डिझेल २२ पैशांनी स्वस्त झाले आहे. पेट्रोल ९६.६५ रुपये तर डिझेल ९३.६३ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. जयपूरमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर घसरलेत पेट्रोल पेट्रोल १०८.४३ रुपये आणि डिझेल ९३.६७ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. येथे ५ पैशांनी घसरण झालीये.

चार प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्ली - पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

  • कोलकाता - पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

  • मुंबई (Mumbai) - पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

  • चेन्नई - पेट्रोल 102.74 रुपये आणि डिझेल 94.33 रुपये प्रति लिटर

Petrol Diesel Price Today
Tea Business : तुमच्या ऑफिस बाहेरचा चहावाला अंदाजे किती पैसे कमवत आहे? वाचा सविस्तर

नवीन दर फक्त एसएमएसद्वारे तपासा -

ग्राहकांच्या सोयीसाठी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलची किंमत (Price) एसएमएसद्वारेच तपासण्याची सुविधा देतात. BPCL ग्राहक 9223112222 वर <डीलर कोड> पाठवतात. इंडियन ऑइलच्या ग्राहकांसाठी, RSP<डीलर कोड> 9224992249 वर पाठवा. HPCL ग्राहकांसाठी नवीन दर जाणून घेण्यासाठी, HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवा. यानंतर, तुम्हाला काही मिनिटांत नवीन दरांची माहिती मिळेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com