Model Divya Ahuja Case Saam Digital
देश विदेश

Model Divya Ahuja Case: 11 दिवस, 25 टीम, 100 किमी तपास... मॉडेल दिव्या पाहुजाच्या हत्येमागची सत्य कहाणी

Model Divya Ahuja Case: प्रसिद्ध मॉडेल मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह अखेर 11 दिवस, 25 टीम, 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर आणि 100 किमी तपासानंतर शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.

Sandeep Gawade

Model Divya Ahuja Case

प्रसिद्ध मॉडेल मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह अखेर 11 दिवस, 25 टीम, 48 तासांच्या शोध मोहिमेनंतर आणि 100 किमी तपासानंतर शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. खुनाच्या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी हॉटेल मालक अभिजीत सिंग, त्याचा कर्मचारी हेमराज आणि ओमप्रकाश या तीन मुख्य आरोपींना अटक केल्यानंतरही मॉडेलचा मृतदेह सापडू शकला नव्हता, त्यामुळे दिव्याची हत्या झाल्यानंतर तिचा मृतदेह शोधणं गुरुग्राम पोलिसांसाठी आव्हान बनलं होतं. एकीकडे पोलिसांची पथकं मेलेले मडदे उकरून काढत होती तर दूसरीकडे मृताचे कुटुंबीय त्याच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत होते. मात्र अखेर 11 दिवसांनी मृतदेह बाहेर काढल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हत्या होऊन ११ दिवस झाले तरी मॉडेल दिव्या पाहुजाचा मृ्तदेह सापड नसल्यामुळे गुरुग्राम पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र विश्वासार्हता डागाळण्याआधीच पोलिसांनी मॉडेलचा मृतदेह ताब्यात घेऊन सर्व प्रश्नांना पूर्णविराम दिला. पोलीस कोठडीत त्याची चौकशी केली असता त्याने दिव्याचा मृतदेह पंजाबमधील पटियालाजवळील भाकर कालव्यात फेकल्याची कबुली दिली. यानंतर त्यांनी बीएमडब्ल्यू कार पटियाला बसस्थानकात सोडून पळ काढला होता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मॉडेल दिव्या पाहुजाच्या मृतदेहाच्या शोधासाठी गुरुग्राम पोलिसांनी तब्बल 25 पथकं तयार केली आहेत. यामध्ये एनडीआरएफ टीमचेही सहकार्य घेऊन पंजाबच्या पटियाला येथून शोध मोहीम सुरू करण्यात आली ती हरियाणातील जाखलपर्यंत सुरू होती. त्यानंतर सुमारे 100 किमी अंतरावरील भाकर कालव्यात मृतदेह शोधणं इतकं सोपं नव्हते. मात्र हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिस आणि एनडीआरएफच्या टीमने हे साध्य केलं. हरियाणातील फतेहाबादच्या टोहना येथील कालव्यात एक मृतदेह सापडला.

मृतदेह बरेच दिवस पाण्यात असल्याने मृतदेह ओळखणं कठीण होतं. छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने ओळख पटू शकली नाही. यानंतर पोलिसांनी दिव्याच्या आईला फोन केला. मृतदेह दिव्याच्या आईला दाखवण्यात आला. शरीरावरील खुणा पाहून त्यांनी मुलीची ओळख पटवली. दिव्याने तिच्या पाठीवर आणि हातावर टॅटू बनवले होते. त्याच्या आईला त्याच्याबद्दल माहिती होती. तो टॅटू पाहताच दिव्याच्या आईच्या अश्रूंचा बांध फूटला. तिच्या मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह तिच्या समोर होता. ज्याचा गेल्या ११ दिवसांपासून शोध सुरू होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: ठाणे स्टेशन स्थानकात रेल्वे प्रवाशांची तुफान गर्दी

Crime : बायकोचं अनैतिक संबंध असल्याचा संशय, नवऱ्याने जावयाच्या मुलाचा प्रायव्हेट पार्टच कापला

Rashmika Mandanna : रश्मिका मंदानाचा ‘Thama’मधील ग्लॅमरस लूक पाहून चाहते थक्क; पोस्टर प्रदर्शित

ठाण्यात पावसाचा धुमाकूळ, शाळा सोडल्या; विद्यार्थ्यांना बोटीतून नेलं, पाहा VIDEO

Aadesh Bandekar Son: आदेश बांदेकरांचा लेक लवकरच अडकणार विवाह बंधानात; 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

SCROLL FOR NEXT