Mauritius Ram Mandir News: हिंदू कर्मचाऱ्यांना २२ जानेवारीला मिळणार विशेष रजा, या देशाने केली मोठी घोषणा

Mauritius Ram Mandir News: २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. जगभारातील हिंदू धर्माचे लोक हा भव्य सोहळा साजरा करणार आहेत. दरम्यान मॉरिशस सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
Mauritius Ram Mandir News
Mauritius Ram Mandir NewsSaam Digital
Published On

Mauritius Ram Mandir News

२२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. जगभारातील हिंदू धर्माचे लोक हा भव्य सोहळा साजरा करणार आहेत. दरम्यान मॉरिशस सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. २२ जानेवारीला मॉरिशसमधील हिंदू धर्माच्या कर्मचाऱ्यांना २ तासांची विशेष रजा देण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान ते रामललाच्या प्राण प्रतिष्ठापणेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या स्थानिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.

मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ यांच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी केलं. ज्यामध्ये, सोमवार, 22 जानेवारी रोजी दुपारी 2 पासून २ तासांची विशेष सुट्टी देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. भारतातील अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापणा कार्यक्रमासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हिंदू धर्माचे कर्मचारी 22 जानेवारीला 2 तासांच्या विशेष रजेवर असतील. कारण ही एक मोठी ऐतिहासिक घटना आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mauritius Ram Mandir News
Maharashtra Farmers News: सोयाबीनचं उत्पादन घटलं, खर्चही निघाला नाही, तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ जानेवारीला भव्य राम मंदिराच्या गर्भगृहात श्री रामलालांच्या मूर्तीची स्थापना करणार आहेत. या भव्य मंदिराच्या उद्घाटनासाठी देशातील अनेक नेते आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे. हा सोहळा 16 जानेवारीपासून सुरू होणार असून 7 दिवस चालणार आहे. राम मंदिराच्या प्राण-प्रतिष्ठेच्या मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी म्हणजे 16 जानेवारीपासून वैदिक विधी सुरू होणार आहेत, अशी माहिती मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Mauritius Ram Mandir News
Ayodhya Ram Mandir Invitation: सचिन तेंडुलकरला मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी जाणार अयोध्येला?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com