राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. मराठवाड्यातील मागासलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यात मागील वर्षभरात सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 30 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल आहे. आज पुन्हा एकदा हिंगोली तालुक्यातील पिंपळखुटा गावातील अल्पभूधारक शेतकरी सुरेश बोन्द्राजी जाधव या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवल आहे.
कोरडवाहू शेतकरी असलेल्या सुरेश जाधव यांच्या शेतात खरीप हंगामातील सोयाबीन पीक घेतलं होत. मात्र पिकाला योग्यवेळी पाणी मिळालं नसल्याने जाधव यांच्या शेतातील सोयाबीनचे उत्पादन घटल आणि लागवड खर्च देखील निघाला नाही. बँकेकडून घेतलेले पीक कर्ज आणि खाजगी सावकाराचं डोक्यावर असलेला कर्ज फेडायचे मुलाबाळांचे शिक्षण कसे भागवायचे, या विवंचनेत शेतकरी जाधव असल्याची माहिती आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुटुंबाला शेतात जाऊन येतो असं सांगून बाहेर पडलेल्या जाधव यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं. जाधव यांच्या आत्महत्येने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून , संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडलं आहे. सरकारने आता तरी आम्हाला कर्जमाफी द्यावी आणि डोक्यावरील कर्जाचा बोझा कमी करावा अशी विनंती जाधव कुटुंबाने केली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.