Raj Thackeay News Saamtv
देश विदेश

Raj Thackeray News: निषेध नको; आता कृती करा अन्यथा... मणिपूर घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

Rashmi Puranik

Raj Thackeray On Manipur Incident: सध्या मणिपूरमधील एका व्हायरल व्हिडिओने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमध्ये ८०० ते १००० लोकांच्या जमावाने दोन महिलांना नग्न करत त्यांची धिंड काढली आहे. इतकेच नव्हेतर नराधमांनी पीडित महिलांना रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे.

या घृणास्पद घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही ट्वीट करत संताप व्यक्त केला आहे. तसेच या नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी.. अशीही मागणी त्यांनी केली आहे.

मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान (Manipur Clashes) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावरून फिरवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनीही ट्वीट करत केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे?

"कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा, पण परिस्थिती 'जैसे थे' आहे. आणि हेच दुर्दैव आहे." असे राज ठाकरे यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे.

"ह्या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपती महोदयांनी ह्यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या ३ महिन्यात जे घडलं त्याने फक्त मणिपूरच नाही तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे.

ह्यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी ह्या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही, आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल... असेही राज ठाकरे यांनी या ट्वीटमध्ये म्हणले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

Health Tips: टोमॅटो आणि काकडी एकत्र खाताय? त्या आधी हे वाचा...

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे अँजिओप्लास्टीनंतर पहिल्यांदाच समोर, एक शब्द अन् कार्यकर्त्यांमध्ये भरला उत्साह; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT