Sharad Pawar On Manipur Viral Video : मणिपूरच्या घटनेवर शरद पवार संतापले, म्हणाले- 'हीच वेळ आहे संघटित होण्याची...'

Manipur Viral Video News: मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावरून फिरवल्याची घटना घडली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar Saam Tv
Published On

Mumbai News: मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या हिंसाचारादरम्यान (Manipur Clashes) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांना रस्त्यावरून फिरवल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल होत असून यावर संताप व्यक्त केला जात आहे.

या व्हिडिओवर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत ट्वीट केले आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी मोदी सरकारला देखील खडेबोल सुनावले आहेत. (Latest Marathi News)

Sharad Pawar
Manipur News : भयावह! मणिपूरमध्ये २ महिलांना निर्वस्त्र करून रस्त्यावर फिरवलं, व्हिडिओ व्हायरल

शरद पवार यांनी मणिपूर घटनेसंदर्भात केलेल्या ट्विटची सुरुवातच भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका वाक्याने केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की,'माणुसकीशिवाय तुझा गौरव व्यर्थ आहे.'(Without humanity, your glory is worthless) मणिपूरमधील घटनेतील विदारक दृश्यामुळे मन दुखावलं आहे. महिलांवरील अत्याचाराचे हे विदारक दृश्य खूपच घृणास्पद आहे. तर हीच वेळ आहे संघटित होण्याची, एकत्र येण्याची, आपला आवाज उठवण्याची आणि मणिपूरच्या लोकांसाठी न्याय मागण्याची.'

Sharad Pawar
Bollywood on Manipur Violence : मणिपूर घटनेवर बॉलिवूड सेलिब्रिटींनी व्यक्त केला रोष, अत्याचाराचा व्हिडिओ पाहून सेलिब्रिटी म्हणाले...

शरद पवारांनी या ट्विटच्या माध्यमातून मोदी सरकारला देखील धारेवर धरले आहे. त्यांनी ट्विटमध्ये पुढे असे देखील म्हटले आहे की, 'मणिपूरमध्‍ये शांतता प्रस्थापित करण्‍यासाठी पंतप्रधान कार्यालयासह गृह विभागाने तातडीने आवश्‍यक कारवाई करणे आवश्‍यक आहे.' तर, मणिपूरच्या या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी असे सांगितले की, 'या घटनेमुळे माझं मन प्रचंड दुखावले आहे. तसंच या घटनेमुळं मला प्रचंड राग आला आहे. ही घटना लज्जास्पद आहे. गुन्हेगारांना सोडणार नाही. दोषींना माफ करणार नाही, अशा शब्दांत मोदींनी राग व्यक्त केला.

Sharad Pawar
Supreme Court on Manipur Viral Video Incident : मणिपूरचा व्हिडिओ आत्मा ढवळून काढणारा; सुप्रीम कोर्टानं केंद्र, राज्य सरकारला फटकारलं

दरम्यान, मणिपूरमधील ही धक्कादायक घटना थौबाल जिल्ह्यातली आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच दोषीवर कारवाईची मागणी केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com