Mizoram Assembly Election Saam Tv
देश विदेश

Mizoram Assembly Election Exit Poll 2023: मिझोराममध्ये प्रादेशिक पक्षांची हवा; काय सांगतोय एक्झिट पोलचा अंदाज?

Mizoram Vidhan sabha : मिझोराम येथे ४० जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे अंदाज आले आहे. या एक्झिट पोलनुसार, एमएनएफचा मोठा विजय होण्याची शक्यता आहे.

Bharat Jadhav

Mizoram Assembly Election Exit Poll 2023:

मिझोराम येथे ४० जागांसाठी झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे अंदाज आले आहे. या एक्झिट पोलनुसार, एमएनएफचा मोठा विजय होण्याची शक्यता आहे. तर देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला मात्र येथे पराभवाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मिझोराम येथे झालेल्या निवडणुकांचे निकाल इतर चार राज्यांच्या निकालासह ३ डिसेंबरच्या दिवशी लागणार आहेत. (Latest News)

मिझोरामचा एक्झिट पोल

CNX च्या EXIT POLL नुसार, भाजपला ००-०२ जागा मिळण्याची शक्यता आहे. MNF ला १४ ते १८ जागा मिळत आहेत, तर कॉंग्रेसला ८-१० जागा मिळण्याची अपेक्षा आहे. इतर पक्षांना १२-१६ जागा मिळू शकतात.

रिपब्लिक भारत आणि मॅट्रिस एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार

  • भाजप- ०१-०२

  • MNF-१७-२२

  • काँग्रेस- ०७-१०

  • ZPM-०७- १२

  • इतर- ००-०१ जागा मिळू शकतात.

एबीपी cvoter

एबीपी सी-वोटरने केलेल्या आपल्या सर्व्हेनुसार, मिझोराममध्ये काँग्रेसला २ ते ८ जागा मिळणार आहेत. मिझो नॅशनल फ्रंटला सर्वाधिक म्हणजे १५ ते २१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाला म्हणजेच भाजपला फक्त २-८ जागा मिळण्याची शक्यता आहे.

टाइम्स नाऊ सीएनएक्सचा अंदाज

या अंदाजात मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंटला अधिक जागा मिळतील असा अंदाज वर्तवलाय. तर भाजपला सर्वात कमी जागा मिळतील. परंतु काँग्रेस पक्षाला १६ जागा मिळतील असा पोलमधून सांगण्यात आलय.

न्यूज एक्स एनईटीएचा अंदाज

या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मिझो नॅशनल फ्रंटला १९ जागा तर काँग्रेसला १५ जागा मिळतील असा अंदाज आहे. इतर पक्षांना सर्व मिळून फक्त ६ जागा मिळतील.

मिझोराममधी सत्ताधारी पक्ष मिझो नॅशनल फ्रंट(एमएनएफ), विरोधी पक्ष झोरम पीपल्स मुव्हमेंट आणि काँग्रेसने सर्व ४० जागांवर आपले उमदेवार मैदानात उतरवले होते. मिझोराममध्ये ७ नोव्हेंबर रोजी मतदान झालं होतं. यावेळी राज्यात ७८ टक्के लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला. जवळपास १७४ उमेदवरांच्या भाग्य अजमावले आहे.

मिझोराममध्ये भाजपने २३ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. तर आम आदमी पक्षाने (आप) ४ जागांवर निवडणूक लढवली आहे. यावेळी २७ अपक्ष उमेदवारांनीही आपले नशीब आजमावले आहे. दरम्यान मतदारांनी कोणाला सत्ता दिली याचे उत्तर ३ डिसेंबरला मिळणार आहे. पण रिपब्लिक भारत आणि मॅट्रिस एजन्सीच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात मिझो नॅशनल फ्रंट (एमएनएफ) सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT