Mizoram Election: काँग्रेसने मिझोराम निवडणुकीसाठी पहिली यादी केली जाहीर, 39 उमेदवारांची घोषणा

Mizoram Assembly Election 2023 : काँग्रेसने मिझोराम निवडणुकीसाठी पहिली यादी केली जाहीर, 39 उमेदवारांची घोषणा
Mallikarjun Kharge - Rahul Gandhi
Mallikarjun Kharge - Rahul Gandhi Saam Tv
Published On

Mizoram Assembly Election 2023:

मिझोरम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. 40 विधानसभा जागा असलेल्या या राज्यात काँग्रेसने 39 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने केवळ लुंगलेई दक्षिण जागेसाठी उमेदवार जाहीर केलेला नाही. मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला मतदान होत आहे. तसेच 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

यातच काँग्रेस नेते राहुल गांधी आज दोन दिवसीय दौऱ्यावर मिझोराममधील आयझॉल येथे पोहोचत आहेत, त्याच दरम्यान ही घोषणा करण्यात आली आहे. या यादीतील पाचपैकी चार विद्यमान आमदारांना आगामी निवडणुकीसाठी तिकीट देण्यात आले आहे.

Mallikarjun Kharge - Rahul Gandhi
Political News: ‘दाल में कुछ काला है’, बोरवणकरांनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांवर पटोले काय म्हणाले...

पालक विधानसभा जागेवर आमदार केटी रोखव यांच्या जागी आयपी ज्युनियर नावाच्या नव्या उमेदवाराला संधी देण्यात आली आहे. या यादीतील इतर उमेदवारांमध्ये मिझोराम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लालसावता यांचा समावेश आहे, जे आयझॉल पश्चिम-3 जागेवरून निवडणूक लढवतील. दरम्यान, पक्षाचे नेते लालनुनमाविया चुआंगो यांना आयझॉल उत्तर-1 जागेवरून उमेदवारी देण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

Mallikarjun Kharge - Rahul Gandhi
Big Political News: मीरा बोरवणकरांच्या निशाण्यावर 'अजित पवार'? पत्रकार परिषद घेत केले गंभीर आरोप

काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत दोन महिला उमेदवारांचाही समावेश असून अल्पसंख्याक चकमा समाजातील दोन उमेदवारांना तिकीट देण्यात आले आहे. पश्चिम तुपी मतदारसंघाचे विद्यमान आमदार निहार कांती चकमा आणि तुईचोवांग मतदारसंघाचे हर प्रसाद चकमा, अशी त्यांची नावे आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com