नवी दिल्ली : भाजप नेता, अभिनेता मिथुन चक्रवर्ती पुन्हा एकदा वादात सापडला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेत वादग्रस्त टिप्पणी केल्याचा मिथुनवर आरोप आहे. या प्रकरणी मिथुन चक्रवर्तीविरोधात बिधाननगर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर नोंद करण्यात आला आहे. यामुळे मिथुन चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
भाजपने साल्टलेकच्या ईजेडसीसी येथे एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मिथुनने वादग्रस्त वक्तव्य केलं. मिथुन चक्रवर्तीने एका नेत्याच्या विरोधात भाष्य करताना वादग्रस्त वक्तव्य केलं.
मिथुन चक्रवर्तीने म्हटलं की, मला वाटलं की, या नेत्याविरोधात मुख्यमंत्री काही बोलतील. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना रोखतील. पण कोणी काही म्हटलं नाही. मी मुख्यमंत्री नाही, पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला कापून भागिरथी नदीत फेकलं जाईल. पण एक दिवस असा येईल. मी त्याला म्हणतोय, मी भागिरथी नदीत नव्हे, तुझ्याच भूमीत फेकू. भागिरथी नदी आमची आई आहे. आम्ही २०२६ सालची निवडणूक जिंकण्यासाठी काही करायला तयार आहोत. तुम्हाला तुमच्या जमीन गाडू. तुम्ही एक फळ कापाल, तर आम्ही चार फळ कापू', असा चक्रवर्ती म्हणाला,
तृणमूल आमदार हुमायू कबीर म्हणाले की, 'मी तुम्हाला २ तासांत भगिरथी गंगामध्ये नाही फेकलं तर मी येथून निघून जाईल. मी शक्तिपूर मतदारसंघात राहणार नाही. तुमच्यापैकी ३० टक्के लोक मुर्शिदाबाद जिल्ह्यात राहतात तर आम्ही ७० टक्के आहोत'.
आमदार हुमायू यांच्या वक्तव्याचा समाचार मिथुनने घेतला. यावेळी मिथुनने केलेल्या वक्तव्याविरोधात पोलीस स्टेसनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तृणमूल आमदार हुमायू कबीर यांनी म्हटलं की, 'मिथुन चक्रवर्तीच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. पोलिसांना तपास करू द्या. अभिनेता म्हणून त्याचा आदर करतो. पंरतु अमित शहा आणि राज्यातील विरोधी पक्ष नेत्यासमोर माझ्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले गेलं. त्याने माझ्या समाजाला जमीनीत गाडण्याची भाषा केली. त्यांच्या लोकांना प्रसिद्धी मिळण्यासाठी वक्तव्य केलं. तो स्वत:ला चाळीस वर्षांचा युवा मानतो. खूप शौर्य दाखवत आहे'.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये २०२६ साली विधानसभा निवडणूक होऊ शकते. निवडणुकीआधीच भाजपने तयारी सुरु केली आहे. नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. या बैठकीत मिथुन चक्रवर्ती यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.