Benjamin Netanyahu viral video Saam
देश विदेश

Fact Check : इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू? व्हायरल व्हिडिओमागील सत्य आले समोर

Benjamin Netanyahu viral video : इराणने मिसाईल हल्ल्यात इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू ठार झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र पडताळणीत हा दावा खोटा ठरला असून नेत्यान्याहू सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Iran Israel missile strike claim : आम्ही व्हायरल व्हिडिओची पडताळणी करतो आणि सत्यता समोर आणतो...आता इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू यांचा हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच नेत्यान्याहूंचा मृत्यू झालाय का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.

इराणच्या खामेनींनंतर आता इस्त्रायलच्या नेत्यान्याहूंना मारल्याचा दावा करण्यात आलाय... मिसाईल हल्ला करून इराणने नेत्यान्याहूंसह वायुसेनेचं मुख्यालय उद्ध्वस्त केल्याचा दावा केलाय...पण, खरंच इराणने नेत्यान्याहूंवर हल्ला केलाय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...

इरानच्या रिवोल्यूशनरी गार्ड्सने इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयावर आणि वायुसेना मुख्यालयावर हल्ला केल्याचा दावा केलाय...'खेबर' बैलिस्टिक मिसाइलने हल्ला केला असून, यात नेत्यान्याहू यांचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय...इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींच्या हत्येचा बदला घेण्यात आल्याचं म्हटलंय...पण, यात तथ्य आहे का...? एवढ्या मोठ्या नेत्याचा हल्ल्यात मृत्यू झाला असेल तर मग बातमी का नाही...? नेत्यान्याहूंवर झालेल्या हल्ल्याची बातमी गुप्त ठेवलीय का...? असे अनेक सवाल उपस्थित होतायत...त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली...यासाठी अनेक मॅगझिन्स पाहिले...तसेच काही आंतरराष्ट्रीय पेपर्सही पडताळून पाहिले...त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

नेत्यान्याहूंच्या ऑफिसवर इराणने हल्ला केला

इराणच्या हल्ल्यात नेत्यान्याहूंचा मृत्यू झालेला नाही

व्हायरल व्हिडिओनंतर नेत्यान्याहू प्रसार माध्यमांसमोर आले

बेंजामिन नेत्यान्याहू हे सुरक्षित असल्याची माहिती

सध्या युद्धात इराण इस्त्रायलवर तर इस्त्रायल इराणवर जोरदार हल्ले करतंय. त्यातच आता वेगवेगळे दावे केले जातायत...मात्र, आमच्या पडताळणीत इराणच्या हल्ल्यात नेत्यान्याहूंचा मृत्यू झाल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

ठाणेकरांची चिंता वाढली; बारवी धरणात फक्त इतकाच पाणीसाठा शिल्लक

Accident: भरधाव डंपरची रिक्षाला धडक, ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT